बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या डीवायईएस ज्युडो सेंटरच्या ज्युडो खेळाडूंनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या 40 व्या कर्नाटक राज्य कनिष्ठ आणि वरिष्ठ ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेमध्ये 16 पदके मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
बेंगलोर येथील जे.पी.नगर येथे गेल्या 18 ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत उपरोक्त स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेमध्ये बेळगाव डीवायईएस ज्युडो सेंटरच्या ज्युडो खेळाडूंनी तब्बल 10 सुवर्णपदकांसह 4 रौप्य पदके आणि 2 कांस्य पदके हस्तगत केली.
या खेरीज अजिंक्यपदाचे दोन करंडक देखील जिंकले. बेळगावच्या सुवर्ण पदक विजेत्या ज्युडो खेळाडूंची आता नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी क्रीडांगणावर येत्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
डीवायईएस जुडो सेंटर बेळगावचे पदक विजेते ज्युडो खेळाडू पुढील प्रमाणे आहेत. भूषण वनारसे (73 किलो सुवर्ण व कांस्य), आर्यन डोंगळे (81 किलो सुवर्ण), रोहन बी. एस. (90 किलो सुवर्ण व रौप्य), सौरभ भावीकट्टी (55 किलो रौप्य), धनुष्य एल. (60 किलो कांस्य), भाग्यश्री बी. (48 किलो सुवर्ण) संजना कुरबर (52 किलो सुवर्ण), सहाना एस. आर. (57 किलो सुवर्ण), राधिका डुकरे (70 किलो दोन सुवर्ण) साईश्वरी के. (78 किलो दोन सुवर्ण), अक्षता सुनकद (63 किलो सुवर्ण), पार्वती अंबाली (70 किलो रौप्य), त्रिवेणी कलकुटगी (78 किलो रौप्य)
उपरोक्त सर्व यशस्वी ज्युडो खेळाडू कर्नाटक युवा सक्षमीकरण आणि क्रीडा खात्याच्या बेळगाव येथील डीवायईएस इनडोअर ज्युडो हॉलमध्ये ज्युडो प्रशिक्षिका एकलव्य पुरस्कार विजेत्या रोहिणी पाटील आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या कुतुजा मुल्तानी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून त्यांना डीवायईएस खात्याचे उपसंचालक श्रीनिवास बी. यांचे प्रोत्साहन लाभत आहे.