बेळगाव लाईव्ह : 9 ते 19 डिसेंबर 2024 या कालावधीत बेळगावमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव आणि बंगळुरू दरम्यान अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. अधिवेशनादरम्यान प्रवाशांची संख्या वाढेल, हे लक्षात घेऊन या सेवेची सुरुवात करण्यात आली आहे.
बेळगावमध्ये 9 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने बंगळुरू आणि बेळगाव यांच्यातील हवाई प्रवास अधिक सुलभ होणार आहे. अधिवेशनात सहभागी होणारे मंत्री, आमदार, अधिकारी आणि इतर प्रवाशांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.
फ्लाइट वेळापत्रक:
बंगळुरू (BLR) ते बेळगाव (IXG): सकाळी 6:00 ते 7:00
बेळगाव (IXG) ते बंगळुरू (BLR): सकाळी 7:30 ते 8:30
ही अतिरिक्त सेवा अधिवेशनाच्या कालावधीत म्हणजेच 9 डिसेंबर 2024 पासून 19 डिसेंबर 2024 पर्यंत चालू राहणार आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत बेळगाव-बंगळुरू दरम्यान उपलब्ध करून देण्यात आलेल्या अतिरिक्त विमानसेवेचा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरेल. या सुविधेमुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून, अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांसाठीही ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.