Saturday, December 14, 2024

/

भेकणे परिवाराचा आधारवड हरपला ..

 belgaum

बेळगाव लाईव्ह : ‘जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला’.. या उक्ती प्रमाणेच आमचे बंधू बाबासाहेब भेकणे यांची यांची अचानक झालेली एक्झिट मनाला चटका लाऊन गेली.अगदी निधनाच्या रात्री पर्यंत आम्हा सर्वांशी गुजगोष्टी करणारे सकाळी आमच्यातून नाहीशे झाले. 2 डिसेंबर 2024 रोजी उद्योजक बाबासाहेब निंगाप्पा भेकणे यांना देवाज्ञा झाली आज बारावा दिवस आहे त्या निमित्ताने…..

भेकणे’ कुटुंबियांचा आधारवड म्हणजे कै निंगाप्पा भेकणे (आण्णा) यांच्यानंतर त्यांची दोन्ही मुले कुलदीप आणि बाबासाहेब यांनी कुटुंबाचा वारसा पुढे चालवत सामाजिक बांधिलकी जोपासली. कै. बाबासाहेब भेकणे हे कुटुंबाचे शेंडेफळ माग प्रत्येक उपक्रमात अगदी पुढे.

बेळगाव तालुक्यातील मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक म्हणून निवडून आल्यानंतर मागील दीड दोन वर्षांपासून सामाजिक कार्यात पुढाकार होता. वेदांत सोसायटी, शहापूर मुक्तिधाम तसेच विविध मंडळामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. मार्कंडेय साखर कारखान्याला नवीन उभारी देण्यासाठी नूतन अध्यक्ष आर. आय. पाटील यांच्यासोबत चाललेली त्यांची धडपड अविस्मरणीय होती.Bhekne

कुंटुंबासाठी और मार्गदर्शक असणारे सर्वांना प्रोत्साहित करणारे बाबासाहेब भेकणे अचानक सोडून गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांचे अचानक जाणे भेकणे कुटुंबाला दुःखाच्या खाईत लोटण्यासारखे ठरले.

आई पत्नी, मुने, भाऊ बहीण, बहिणी, पुतण्या, पुतणी यांच्याशी रोजचा होणारा बाबासाहेबांचा संवाद आता थांबला आहे.यामुळे तुमचे जाणे सर्वांनाच पोरके करुन गेले आहे तुम्हाला विसरणे अशक्य आहे. तुम्ही नेहमीच आमच्या मनात क्षणात असाल.Bhekne

तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, आमच्या परिवाराचा आधारवड असणाऱ्या आमच्या बंधुना भावपूर्ण श्रद्धांजली.

-राधिका सांबरेकर (पत्रकार)

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.