बेळगाव लाईव्ह :एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंग्राळी खुर्द गावामध्ये श्री मसनाई देवी यात्रा होणार असल्यामुळे आज मंगळवार दि. 17 आणि उद्या बुधवार दि. 18 डिसेंबर रोजी एपीएमसी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.
कंग्राळी खुर्द येथील सदर यात्रेस सुमारे 20 ते 30 हजार भाविक हजेरी लावणार असल्यामुळे एपीएमसी मार्केट यार्ड परिसरातील रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण वाढणार आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक आणि त्यांच्या वाहनांची गर्दी होणार असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज आणि उद्या असे दोन दिवस एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एपीएमसी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सचिवांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.