Monday, November 18, 2024

/

अन्… ‘यांनी’ केला भिक्षुकाचा कायापालट!*

 belgaum

बेळगाव लाईव्ह :मानसिक स्थिती काहींशी बिघडल्याने शहरात दाढी वाढवून अस्वच्छ तेलकटलेल्या गबाळ पोशाखात भिकाऱ्याप्रमाणे वावरणाऱ्या एका युवकाला अंघोळ वगैरे घालून त्याच्यात व्यक्तिमत्त्वात अमुलाग्र बदल करण्याचे माणुसकीचे दर्शन घडवणारे कार्य सेवा + एकता फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच केले.

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, शहरामध्ये मानसिक स्थिती काहीशी बिघडलेला एक युवक डोक्याचे केस आणि दाढी वाढलेल्या अवस्थेत अंगावर अस्वच्छ तेलकट मळके कपडे घालून रस्त्यावर हिंडत होता. सदर युवक सेवा + एकता फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याला अडवून विचारपूस केली.

तसेच त्याची समजूत काढून कार्यकर्त्यांनी त्याला स्वतः सोबत नेऊन सर्वप्रथम शाम्पू लावून स्वच्छ आंघोळ घातली. त्यानंतर त्याच्या अंगावरील अस्वच्छ मळके कपडे फेकून देऊन त्याला नवीन कपडे परिधान करण्यास दिले.

एवढे करून न थांबता सेवा + एकता फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्या युवा भिकाऱ्याला सलूनमध्ये नेऊन त्याची दाढी व फॅशनेबल कटिंग करवले. या पद्धतीने स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात होणारा अमुलाग्र बदल त्या युवकाला सुखावत असल्याचे त्याच्या आनंदी चेहऱ्यावरून दिसत होते.Ekta foundation

त्या गचाळ, अस्वच्छ भिकाऱ्याचे टापटीप युवकांमध्ये परिवर्तन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली.

आता त्या युवकाचा तपशील गोळा करून त्याला त्याच्या कुटुंबीयांकडे स्वाधीन करण्याची तयारी सेवा + एकता फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. या त्यांच्या आदर्शवत कार्याचे सर्वत्र कौतुक आणि प्रशंसा होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.