बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये एस.जी.आय.एस. बेळगाव युनिव्हर्सिटी फेअर २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. 23 नोव्हेंबर रोजी आयोजिण्यात आलेल्या या कार्यक्रमात दहाहुन अधिक जास्त प्रतिष्ठित विद्यापीठांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
हा कार्यक्रम सकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:00 पर्यंत चालणार असून यादरम्यान विद्यार्थ्यांना देशविदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींबद्दल सखोल माहिती देण्यात येणार आहे.
विविध अभ्यास शाखांमध्ये विखुरलेल्या या विद्यापीठांसह, हा फेअर हायस्कूल/कॉलेज विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोर्स शोधण्यासाठी, प्रवेश प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी आणि शिष्यवृत्तीच्या संधींचा शोध घेण्यासाठी एक उत्कृष्ट संधी आहे.
प्रत्येक विद्यापीठाचे प्रतिनिधी वैयक्तिक मार्गदर्शन देण्यासाठी उपस्थित असतील आणि कॅम्पस जीवन, डिग्री कार्यक्रम आणि करिअर मार्गाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे देतील.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी मिळेल, विद्यार्थ्यांसाठी हे त्यांचे शैक्षणिक भविष्य जाणून घेण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी एक अमूल्य अनुभव असेल, असे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सॅमसन गॉसाल्वेस यांनी सांगितले.
फेअरमध्ये कॉलेज अर्ज प्रक्रिया, आर्थिक सहाय्य पर्याय, आणि योग्य कोर्स व विद्यापीठ कसे निवडावे यावर कार्यशाळा देखील आयोजित केल्या जातील. विद्यार्थ्यांना आपले प्रश्न आणि चर्चेसाठी उपयुक्त शैक्षणिक कागदपत्रे आणण्याची शिफारस करण्यात येत आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी, तसेच नोंदणीसाठी +919112259796 किवा +918867424101 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.