बेळगाव लाईव्ह:स्टार एअरलाइन्सकडून बेळगाव ते तिरुपती दरम्यानच्या विमान सेवेचे बुकिंग येत्या 6 डिसेंबरपासून बंद करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे.
बेळगाव शहरातून तिरुपती, नवी दिल्ली, मुंबई वगैरे ठिकाणी विमान सेवा आहे. मात्र यापैकी कांही विमानसेवा टप्प्याटप्प्याने बंद होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
कांही वर्षांपासून स्टार एअरची तिरुपती -बेळगाव ही विमानसेवा सुव्यवस्थेत सुरू असून या विमान सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. मात्र आता तांत्रिक कारणास्तव स्टार एअरने 6 डिसेंबरपासून तिरुपती बेळगाव विमानसेवेचे बुकिंग बंद केले आहे. त्यामुळे ही विमानसेवा कांही कालावधीसाठी बंद होण्याची शक्यता आहे.
दरम्यान या संदर्भात बोलताना बेळगाव विमानतळाचे संचालक एस. त्यागराजन यांनी स्टार एअरकडून बेळगाव -तिरुपती ही विमान सेवा चालविली जाते. मात्र येत्या 6 डिसेंबरपासून दुरुस्तीकरणास्तव त्यांच्याकडून बुकिंग बंद केले आहे.
त्यामुळे ही विमानसेवा बंद होण्याची शक्यता आहे. बंद झाल्यानंतर ही विमानसेवा पुनश्च केंव्हा सुरू होईल याची माहिती मिळालेली नाही. मात्र लवकरच तेही स्पष्ट होईल, असे सांगितले.