बेळगाव लाईव्ह : राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 9 ते 19 डिसेंबर दरम्यान बेळगावातील सुवर्णसौध येथे होणार असून, मंगळुरु सर्किट हाऊस येथे विधानसभा अध्यक्ष यू.टी. खादर यांनी आज बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली.
मंड्यामध्ये कन्नड साहित्य संमेलन असल्याने सरकारने अधिवेशन 19 डिसेंबरला संपवण्याचा निर्णय घेतला आहे. 9 डिसेंबर रोजी सभापतींच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कायदामंत्री, सर्व राजकीय नेते आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेऊन अधिवेशन सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
अधिवेशनात राज्याच्या विकासावर विशेषत: उत्तर कर्नाटकच्या विकासावर चर्चा होणार आहे. यामुळे त्या भागातील लोकांच्या भावनांचा आदर आहे. याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांनी सहकार्य करावे, अशी विनंती सभापतींनी केली.