बेळगाव लाईव्ह: बेळगाव तहसीलदार कार्यालयात आत्महत्या केलेल्या एसडीए कर्मचारी रुद्रेश यडवण्णावर याच्या प्रकरणाला मोठा ट्विस्ट अर्थात कलाटणी मिळाली असून खडेबाजार उपपोलीस प्रमुखांना (डीएसपी) एका निनावी पत्राद्वारे ही आत्महत्या नसून ‘हत्त्या’ असल्याचे कळविण्यात आले आहे.
रुद्रेश यडवण्णावर यांच्या हत्येचे मूळ कारण तहसीलदारांचा जीप चालक आहे. पोलिसांनी तहसीलदारांची चौकशी केल्यास सर्व तथ्य समोर येईल, असे उपपोलीस प्रमुखांसह पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रादेशिक आयुक्त, राज्यपाल, एसी, मानवाधिकार आयोग यांना निनावी पत्र लिहून कळविण्यात आले आहे.
रुद्रेशची आई मल्लव्वा यडवण्णावर हिने माझा मुलगा आत्महत्या करणारा भित्रा नाही. त्याची हत्या झाली. पोलिस आम्हाला योग्य माहिती देत नाहीत असे स्पष्ट करून माझ्या मुलाच्या मृत्यूला न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी केली आहे.
माझ्या मुलाचा खून करणाऱ्या आरोपीला जामीन मिळाला आणि तो राजरोस कामावर येत आहे. याचा अर्थ पोलीस योग्य तपास करत नाहीत. तेंव्हा पोलिसांनी योग्य तपास करून आम्हाला न्याय द्यावा, असेही ती म्हणाली.