बेळगाव लाईव्ह:भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो मधून सेवानिवृत्त झालेले एक ज्येष्ठ अधिकारी वासुदेव भट यांचे अलीकडेच बेळगाव मुक्कामी दुःखद निधन झाले .
निधनसमयी त्यांचे वय 80 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी डॉक्टर शारदा आचार्य एक चिरंजीव व एक कन्या असा परिवार आहे बेळगाव येथील किल्ल्यामध्ये पूर्वी असलेल्या भाषा व धर्म अल्पसंख्यांक कार्यालयात त्यांनी असिस्टंट कमिशनर या पदावर कार्य केले होते.
या पदावर कार्य करत असताना त्यांनी पाठवलेल्या अहवालावरून ते किती कर्तव्यदक्ष अधिकारी होते याची प्रचिती येते सीमा प्रदेशातील मराठी आणि उर्दू भाषिक अल्पसंख्यांकांच्या समस्यांची त्यांना पूर्ण जाणीव होती त्यांचे प्रश्न काय आहेत याबद्दल त्यांनी सखोल अभ्यास केला होता आणि याबाबत केंद्र सरकारला पाठविलेल्या अहवालामध्ये त्यांनी अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे रक्षण करण्या संदर्भात आपले मत स्पष्टपणे मांडले होते.
विशेषतः कर्नाटकातील सरकारने पहिली इयत्तेपासून कन्नड ची सक्ती करावी असा जो आदेश दिला होता त्या संदर्भात कन्नड ची सक्ती ही पहिल्या इयत्तेपासून करू नये ती तिसऱ्या इयत्तेपासून करावी असा अहवाल त्याने दिला होता वासुदेव भट यांच्या अहवालामुळेच सीमा प्रदेशातील मराठी भाषिकासंदर्भात भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने दोन खास अहवाल दिले होते.
येथील अल्पसंख्यांकांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात व त्यांना न्याय मिळवून देण्यासंदर्भात ते कार्यरत असायचे एक कर्तव्यदक्ष आणि सौजन्यशील अधिकारी अशी त्यांची ख्याती होती त्यांच्या कार्यालयातील कर्मचारीही आलेल्या नागरिकांची सौजन्यपूर्ण वागायचे श्री वासुदेव भट यांच्या निधनाने एक कर्तव्यदक्ष आणि सौजन्य मूर्ती अधिकारी हरपल्याची भावना समितीच्या नेतेमंडळीने व्यक्त केली आहे