Sunday, January 19, 2025

/

बीम्सच्या औषध गोदामावर लोकायुक्तांची धाड

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बळ्ळारी येथे बाळंतिणींच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरएलएस आयव्ही ग्लुकोजचा साठा बेळगावच्या बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलच्या औषध गोदामामध्ये आढळून आला आहे. हॉस्पिटलच्या आवारातील औषध गोदामावर आज शनिवारी दुपारी लोकायुक्तांनी टाकलेल्या धाडीत ही बाब उघडकीस आली आहे.

लोकायुक्त जिल्हा पोलीस प्रमुख हणमंत राय यांच्या मार्गदर्शनाखाली लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज शनिवारी दुपारी बीम्स हॉस्पिटल आवारातील औषधांच्या गोदामावर धाड टाकली. त्यावेळी आठ लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील कर्मचाऱ्यांनी गोदामातील औषध साठ्याची झडती घेतली असता गोदामामध्ये 10 बॉक्स आरएलएस आयव्ही ग्लुकोजचा साठा आढळून आला.

पी. बी. पी. संस्थेने पुरवठा केलेल्या हा साठा ताब्यात घेणाऱ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आयव्ही ग्लुकोजचे असंख्य रिकामी बॉक्स पाहून धक्का बसला. धाडी दरम्यान लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सदर गोदामातून गेल्या एप्रिल महिन्यात बेळगाव जिल्ह्याभरात पुरवठा केल्या गेलेल्या आरएलएस आयव्ही ग्लुकोजबद्दल तासाभरापेक्षा अधिक काळ तपासणी करून माहिती गोळा केली.

त्याचप्रमाणे औषध गोदामाच्या अधिकाऱ्यांकडून आरएलएस आयव्ही ग्लुकोजचा कुठे कुठे पुरवठा केला गेला? याची माहिती घेण्यात आली. त्यावेळी सिव्हिल हॉस्पिटल, तालुका हॉस्पिटल, समुदाय आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरवठा करण्यात आलेल्या आरएलएस आयव्ही ग्लुकोजची माहिती गोदाम अधिकाऱ्यांनी दिली.Bims

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसूती वेळी सिझरिन झालेल्या बाळंतिणींसाठी आरएलएस आयव्ही ग्लुकोज या औषधाच्या सलाईनचा वापरला जातो. मात्र त्याच्या वापरामुळे अलीकडेच बळ्ळारी येथे कांही बाळंतीण महिला आणि नवजात शिशुंचा मृत्यू झाला होता. त्याहून अधिक बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बाळंतीण महिला व मुलांच्या मृत्यूच्या घटना घडल्या. प्रारंभी या मृत्यूंबद्दल गुढ निर्माण झाले होते, मात्र मृतांच्या उत्तरीय तपासणीच्या अहवालात त्यांच्या मृत्यूस आरएलएस आयव्ही ग्लुकोज कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले.

या पद्धतीने आर एलएसआय आव्ही ग्लुकोज सलाईनमुळे बाळंतीण आणि नवजात शिशूंच्या जीवितास धोका असल्याचे स्पष्ट होताच त्यावर तात्काळ बंदी घालण्यात आली होती. राज्याचे वैद्यकीय मंत्री दिनेश गुंडूराव यांनीही सदर सलाईनवरील बंदीचा आदेश जारी करून त्याचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे.

सदर आदेशाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी याची दक्षता घेतली जात असताना बेळगाव व बळ्ळारी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये आरएलएस आयव्हीचा वापर सुरूच असल्याची माहिती मिळताच प्रथम बळ्ळारी येथील हॉस्पिटल वर धाड टाकल्यानंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलच्या औषध गोदामावर धाड टाकली. लोकायुक्तांच्या या धाडीमुळे गोदाम प्रमुखांचे धाबे दणाणण्याबरोबरच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकच खळबळ उडाली होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.