Thursday, November 28, 2024

/

एकतर्फी प्रेमातून हॉस्पिटलमध्ये तरुणाचा नर्सवर हल्ला

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये एक थरारक घटना घडली असून ज्यामध्ये प्रेमास नकार दिल्यामुळे एका तरुणाने नर्सवर प्राणघातक हल्ला केला. गेल्या 30 ऑक्टोबर रोजी घडलेली आणि सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नुकतीच उघडकीस आली आहे.

प्रकाश जाधव असे आरोपीचे नांव असून त्याने रागाच्या भरात हॉस्पिटलमध्ये नर्सवर चाकूने हल्ला केले. या हल्ल्याने फक्त त्या नर्सवरच आघात झाला नाही तर तिच्या कुटुंबावरही खोलवर परिणाम झाला असून ज्याचे पर्यवसान तिच्या वडिलांच्या मृत्यूमध्ये झाले आहे.

आरोपी प्रकाश हा त्या नर्सने आपल्या प्रेमाचा स्वीकार करावा यासाठी तिचा पाठलाग वगैरे करून सतत छळ करत होता. तिच्यावर लग्न करण्यासाठी सतत दबाव टाकत होता. प्रकाशने आपल्या कुटुंबासह नर्सच्या घरी जाऊन लग्नाचा प्रस्तावही दिला होता.

तथापी तिच्या कुटुंबीयांनी हा प्रस्ताव ठामपणे नाकारला. तिने सतत नकार दिल्याने संतप्त होऊन प्रकाशने बॅगेत लपवलेला चाकू घेऊन हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर स्वागत कक्षामध्ये घुसून त्याने त्या नर्सवर क्रूर हल्ला केला.

हल्ल्याचा हा संपूर्ण प्रकार हॉस्पिटल मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकाश जाधव याला तात्काळ अटक केली असून खडेबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी प्रकाश हा बऱ्याच काळापासून त्या नर्सचा पाठलाग करत होता आणि लग्नासाठी दबाव आणत होता. तिने नकार देऊनही, त्याने तिचे मन वळवण्याचे आपले प्रयत्न सुरूच ठेवले होते याची पोलीस अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे. तथापि आरोपी प्रकाश याच्या प्रयत्नांचा शेवट त्या नर्सवर प्राणघात हल्ला करण्यामध्ये झाला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.