Tuesday, November 19, 2024

/

उत्तर कर्नाटकासह आपल्यालाही मंत्रिपद मिळावे : आम. असिफ सेठ

 belgaum

बेळगाव लाईव्ह : उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी उत्तर कर्नाटकाला मुख्यमंत्रीपद मिळायला हवे, अशी मागणी बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार असिफ सेठ यांनी केली.

शिवाय मंत्रिपदासाठी आपण देखील इच्छुक असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.

आज बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, उत्तर कर्नाटकातील आमदारांना मंत्रिमंडळात अधिक प्रतिनिधित्व मिळावे, अल्पसंख्याक समुदायाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मंत्रिमंडळात अधिक जागा मिळाव्यात.

उत्तर कर्नाटकातील आमदारांची संख्या लक्षणीय आहे यामुळे उत्तर कर्नाटकाला मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.