Thursday, December 19, 2024

/

अज्ञात युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सांबरा विमानतळाच्या परिसरात सोमवारी पहाटे एका युवकाची दगडाने ठेचून क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी पहाटे बेळगाव जिल्ह्यातील सांबरा विमानतळालगत असणाऱ्या शेतात एका युवकाचा मृतदेह येथील काही शेतकऱ्यांना आढळून आला.

निर्घृणपणे खून झालेला मृतदेह पडलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर शेतकऱ्यांनी तातडीने पोलिसांना हि बाब कळवली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने तपासाची प्रक्रिया सुरू केली.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात, या युवकाच्या डोक्यावर दगडाने गंभीर हल्ला केल्याचे निदर्शनात आले. मृताच्या खिशात दुचाकीची किल्ली सापडल्याने, या प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. अद्याप मृताची ओळख पटलेली नाही. निर्जन स्थळी आढळून आलेल्या मृतदेहामुळे यामागील कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली आहेत.

घटनेची माहिती मिळताच बेळगावचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मरिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, याबाबत अधिक तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.