बेळगाव लाईव्ह : गेल्या प्रत्येक महिन्यापासून बेळगाव वेंगुर्ला रस्त्याच्या झालेला दुर्दशेवर प्रशासनाला जाग आणून देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी मोठ्या आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी एकच्या दरम्यान उचगाव क्रॉस येथे रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला जाग आणून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्र एकीकरण समितीने यासाठी गावोगावी बैठका घेत जनजागृती केली आहे. आंदोलन व्हायच्या अगोदरच प्रशासनाने याची दखल घेत रस्त्याची डागडूजी सुरू केली आहे मात्र कायमस्वरूपी रस्ता दुरुस्त करावा यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे.
सदर रस्ता ना दुरुस्त असल्यामुळे, मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्ड्यांची संख्या झाल्याने लोकांना ये-जा करणे कठिण झाले आहे. रोज अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे सातत्याने मागणी करून सुद्धा रस्त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे तालुका म. ए. समितीच्या पदाधिकार्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांची भेट घेऊन रस्त्याचे काम हाती घ्यावे अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. पण मुदतीत रस्ता काम करण्यात आले नाही. त्यामुळे रास्तारोको आंदोलन निश्चित करण्यात आले आहे.
तालुका समितीने रास्तारोको करण्याचा इशारा दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे काही प्रमाणात डागडुजी करण्याचे काम हाती घेतले. मात्र रस्त्याचे चांगल्या प्रकारे काम पूर्ण करावे यासाठी रास्तारोको केला जाणार असून या रस्त्यासह तालुक्यातील तर रस्त्यांचे देखील काम हाती घ्यावे याकडेही लक्ष वेधले जाणार आहे.
त्यामुळे तालुक्याच्या सर्वच भागातील कार्यकर्त्यांनी रास्तारोकोत सहभागी व्हावे, यासाठी जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे रास्तारोकोमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
या रास्तारोको आंदोलनात लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत, यासाठी ठिकठिकाणी बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली होती. त्याला सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या आंदोलनात लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.