Thursday, January 23, 2025

/

काळा दिन, जय महाराष्ट्र, विधिमंडळ खटला सुनावणी लांबणीवर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : १ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत बंदूकधारी घोडेस्वार रत्नप्रसाद पवार यांच्यासह पाच जणांवर मार्केट पोलिसांत, ‘जय महाराष्ट्र’ असा मजकूर लिहिलेली महाराष्ट्र परिवहन मंडळाची वस मध्यवर्ती बसस्थानकावर दाखल झाल्यानंतर स्वागत करण्यासाठी गेलेल्या समिती कार्यकर्त्यांवर मार्केट पोलिसांत आणि कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाविरोधात २०२१ मध्ये व्हॅक्सिन डेपो मैदानावर विनापरवाना महामेळावा घेतल्याप्रकरणी चौथ्या जेएमएफसी न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यांची सुनावणी लांबणीवर पडली आहे.

१ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत बंदूकधारी घोडेस्वार रत्नप्रसाद पवार यांच्यासह पाच जणांवर मार्केट पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची सुनावणी द्वितीय जेएमएफसी न्यायालयात सुरू असून आज या खटल्याची सुनावणी होणार होती. मात्र, सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून २० डिसेंबररोजी पुढील सुनावणी होणार आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनानुसार दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या विरोधात काळ्या दिनानिमित्त मूक सायकल फेरी काढली जाते. त्याप्रमाणे २०१७ रोजी करण्यात आलेल्या सायकलफेरीवेळी रत्नप्रसाद पवार हे बंदूक घेऊन घोड्यावर स्वार झाले होते. त्यामुळे त्यांच्यासह पाच जणांविरोधात मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या खटल्याची सुनावणी द्वितीय जेएमएफसी न्यायालयात सुरू आहे. आज या खटल्याची सुनावणी होणार होती. मात्र, सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून २० डिसेंबर रोजी या खटल्याची सुनावणी होणार आहे. संशयितांच्यावतीने ऍड. महेश बिर्जे, ऍड. बाळासाहेब कागणकर, ऍड. वैभव कुट्रे काम पाहत आहेत.

याचप्रमाणे ‘जय महाराष्ट्र असा मजकूर लिहिलेली महाराष्ट्र परिवहन मंडळाची वस मध्यवर्ती बसस्थानकावर दाखल झाल्यानंतर स्वागत करण्यासाठी गेलेल्या समिती कार्यकर्त्यांवर मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची द्वितीय जेएमएफसी न्यायालयात आज सुनावणी होणार होती.

मात्र, सदर सुनवाणी पुढे ढकलण्यात आली असून १२ डिसेंबररोजी सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसवर जय महाराष्ट्र असे लिहिण्यात आल्यानंतर सदर बस प्रथमच मध्यवर्ती बस स्थानकावर दाखल झाली. त्यावेळी बसचे स्वागत करण्यासाठी गेलेल्या गणेश दड्डीकर, मदन बामणे, सूरज कणबरकर, मेघन लंगरकांडे यांच्यासह बसचालक आणि वाहकावर मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. न्यायालयात दोषारोप दाखल केल्याने द्वितीय जेएमएफसी न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. मात्र, आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून १२ डिसेंबररोजी सुनावणी होणार आहे.

यासह कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाविरोधात २०२१ मध्ये व्हॅक्सिन डेपो मैदानावर विनापरवाना महामेळावा घेतल्याप्रकरणी चौथ्या जेएमएफसी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी ६ डिसेंबर रोजी होणार आहे. २०२१ मध्ये व्हॅक्सिन डेपो मैदानावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, विनापरवाना महामेळावा घेतल्याप्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, शुभम शेळके, रेणू किल्लेकर, प्रकाश शिरोळकर, सरिता पाटील, शिवाजी सुंठकर यांच्यासह ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी न्यायालयात दोषारोप दाखल केल्याने चौथ्या जेएमएफसी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज या खटल्याची सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ६ डिसेंबररोजी पुढील सुनावणी होणार आहे. समिती नेते व कार्यकत्यांच्या वतीने ऍड.. महेश बिर्जे, ऍड. बाळासाहेब कागणकर, वैभव कुट्रे काम पाहत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.