Thursday, January 9, 2025

/

बेळगावचे पोलीस श्वान ‘माया’ स्फोटक तपासात राज्यात प्रथम

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हा पोलीस श्वान दलातील ‘माया’ या श्वानाने स्फोटक तपास विभागात राज्यात प्रथम क्रमांक, त्याचप्रमाणे बेळगाव शहर पोलीस दलातील ‘रोझी’ हिने गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासात राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

बेंगळूर येथे गेल्या दि. 20 व 21 नोव्हेंबर रोजी झालेल्या राज्य पातळीवरील कर्तव्य मेळाव्यात संपूर्ण राज्यातील अधिकारी व श्वानपथकांनी भाग घेतला होता. पोलीस श्वानांमध्ये स्फोटकांचा तपास करणाऱ्या माया हिने स्फोटक तपास मोहिमांमध्ये राज्य पातळीवर सर्वात सरस कामगिरी केल्यामुळे तिला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

तसेच शहर पोलीस दलातील रोझी या श्वानाने गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासात राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. माया हिला मलकारी यमगार व मंजुनाथ कसवण्णावर हे दोघे, तर रोझीला रुद्रय्या माविनकट्टीमठ व संतोष पाटील हे हाताळतात. पोलीस दलातील प्रत्येक श्वानाला दोन हँडलर असतात, ज्यांचा आदेश पोलीस श्वान ऐकतात. ‘माया’ व ‘रोझी’ या दोघी पोलीस कर्तव्य मेळाव्यात आपल्या हँडलरांसह सहभागी झाल्या होत्या.Dog

राज्य पातळीवरील या मेळाव्यात बेळगाव उत्तर विभागाला एकूण 8 पदके मिळाली आहेत. त्यामध्ये 2 सुवर्ण, 4 रौप्य व 2 कांस्यपदकांचा समावेश आहे. या मेळाव्यात राज्यातील 328 पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. बेळगाव उत्तर विभागातील विजापूर, बागलकोट, धारवाड, गदगसह संपूर्ण राज्यातून 57 पोलीस श्वान सहभागी झाले होते.

राज्य पातळीवरील या मेळाव्यात माया व रोझीने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचे कौतुक आणि त्यांच्या हँडलर्सची प्रशंसा होत आहे. मायाची निगराणी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली, तर रोझीची देखरेख पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांच्या अखत्यारित केली जाते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.