बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात हरगापुरा गावाजवळ दरोडेखोरांनी पिस्तुलचा धाक दाखवून कारमधील 75 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापूरहून केरळकडे जाणाऱ्या इनोव्हा कारचा दरोडेखोरांनी सिनेमॅटिक पद्धतीने पाठलाग केला. हरगापुरा गावाजवळ कार थांबवून त्यांनी पिस्तुलचा धाक दाखवून कारमधील प्रवाशांना खाली उतरवले
आणि कारमधील 75 लाख रुपयांचा ऐवज घेऊन फरार झाले. कारमधून जाणारे सोन्याचे व्यापारी सूरज वनमाने हे केरळला सोन्याचा व्यापार उरकून परतत होते. मात्र वाटेतच दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा घातला.
घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.