Thursday, December 19, 2024

/

ग्रामपंचायत पोटनिवडणूक : ३३ जागा बिनविरोध, १४ जागांसाठी होणार निवडणूक

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील 46 ग्राम पंचायतींमध्ये रिक्त असलेल्या 48 जागांपैकी 33 जागांवर बिनविरोध निवड झाली आहे, तर उर्वरित 14 जागांसाठी 23 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत.

जिल्ह्यातील विविध ग्राम पंचायतींमध्ये रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुका घेतल्या जात असून यासाठी 48 जागांसाठी 95 अर्ज दाखल झाले होते. शुक्रवारी माघारीचा दिवस संपल्यानंतर, 33 जागांवर बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले.

उर्वरित 14 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया 23 नोव्हेंबरला पार पडणार आहे. या निवडणुका सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार असून, त्यासाठी आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे.

14 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये बस्तवाड, बेकिनकेरे, कंग्राळी खुर्द (अलतगा), चंदूर, नाईंग्लज, निडगुंदी, अरताळी, मरकट्टी, हिरेकुंभ, कोगनोळी, संडूर, बिडी, जांबोटी, आणि हलशी या ग्राम पंचायतींचा समावेश आहे. तर मारिहाळ, होनगा, बेनकनहळ्ळी, संतिबस्तवाड, कंग्राळी खुर्द, मावनूर, घोडगेरी, शिरढाण, गुडस, केरुर, चंदूर, करोशी, नेज, शिरुर, शिरहट्टी, उडीकेरी, हण्णीकेरी, व्हनूर, गेवनकोप, हिरेकोप के. एच., कंदापूर, उदपुडी, गोडची, घटकनूर, मंगसुळी, मोळे, मुन्याळ, यादवाड, यमगर्णी, हिरेमुनवळी, इटगी, घोडगाळी, नंदगाव या ग्राम पंचायतींमधील रिक्त जागांवर सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

तर खानापूर तालुक्यातील गुंजी ग्राम पंचायतीमध्ये उमेदवारी अर्जच दाखल झाला नाही. ग्राम पंचायतींचा केवळ एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे 48 जागांपैकी बहुतांशी ग्राम पंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुकीला पाठिंबा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.