बेळगाव लाईव्ह: बेळगाव जिल्ह्यातील विविध कारणांनी ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या पंचायत सदस्य पदासाठी पोटनिवडणुका घेतल्या जात आहेत. मंगळवारी 12 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असून 23 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवडणूक वेळापत्रक आणि रिक्त असलेल्या जागांसाठीचे आरक्षण जाहीर केले आहे.
निवडणूक वेळापत्रकानुसार 12 नोव्हेंबर रोजी एकच दिवस अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रिया होणार असून 13 नोव्हेंबरला अर्ज पडताळणी होईल. 15 ला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस असून 23 नोव्हेंबरला सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
तर 26 नोव्हेंबर रोजी याचा निकाल जाहीर केला जाणार आहे. जिल्ह्यात एकूण 48 जागांसाठी ही पोटनिवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.