Thursday, November 21, 2024

/

विविध मागण्यांसाठी राज्य शेतकरी संघ व हरित सेनेचे आंदोलन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना भाताच्या पिकासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत घोषित करण्यासह विविध मागण्यांसाठी निवेदन दिले.

गुरुवारी, राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्हा प्रशासन कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मदतीसाठी सर्वेक्षण करण्याची विनंती केली, जेणेकरून तातडीने मदत प्रदान केली जाऊ शकेल. पावसामुळे भात आणि इतर पिकांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी तातडीने मदतीची मागणी करण्यात आली.Dc off

शेतकऱ्यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा त्वरित आढावा घेऊन मदतीचा निर्णय घ्यावा. तसेच भातपिकासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत दिली जावी, अशी मागणी करण्यात आली.

या वेळी अप्पासाहेब देसाई, मारुती कडेमणी, सुभास धायगोंडे, रामनगौड पाटील, चंद्रु राजाई, राजू कागणिकर, नामदेव दुडम, फकीरा सदावर यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.