Sunday, January 5, 2025

/

‘त्या’ आत्महत्येची सखोल, जलद चौकशी व्हावी – माजी आ. बेनके

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगाव तहसीलदार कार्यालयातील मयत सरकारी कर्मचारी रुद्रण्णा यडवण्णावर यांच्या आत्महत्येचा सर्वंकष व जलद तपास झाला पाहिजे असे मत भाजपचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी व्यक्त केले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी बेळगाव तहसीलदार कार्यालयात प्रथम श्रेणी सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले मयत रुद्रण्णा यडवण्णावर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

मृत व्यक्तीच्या कागदपत्रांमध्ये गुन्हेगारांची नावे नमूद करण्यात आली आहेत. तसेच बेळगाव शहर व जिल्ह्यात गुन्हेगार उपलब्ध असतानाही जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग तपासात दिरंगाई करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यावेळी यडवण्णावर कुटुंबीयांनी केला.Benke

या कुटुंबाचे सांत्वन केल्यानंतर बोलताना भाजपचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी सध्या आणखी एक सरकारी कर्मचारी आत्महत्येच्या स्वरूपात काँग्रेस सरकारच्या कारभाराचा बळी ठरला असल्याचे सांगितले. तसेच तपासातील या दिरंगाईमागे कोणाचा हात आहे याचा तपास झाला पाहिजे.

रुद्रण्णा यडवण्णावर यांच्या आत्महत्येचा सखोल सर्वंकष व जलद गतीने तपास झाला पाहिजे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर सविता कांबळे, भाजप बेळगाव जिल्हाध्यक्षा गीता सुतार, भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड. एम. बी.जिरली आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.