बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा रमेश कत्ती यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर निवडणूक घेतली जाणार असून येत्या १३ नोव्हेंबर रोजी डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
बेंगळुरू सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्तांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रिक्त अध्यक्षपदासाठी होणारी निवडणूक बँकेच्या संचालक मंडळाच्या सभा भवनात होणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता निवडणूक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे, सर्व सदस्यांनी या सभेला वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बँकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक सभेच्या वेळेच्या २ तास आधी आपला उमेदवारी अर्ज लेखी स्वरूपात रिटर्निंग ऑफिसरकडे सादर करावा आणि निवडणुकीनुसार बैठकीला उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.
रमेश कत्ती यांनी राजीनामा दिला नंतर रिक्त झालेल्या या पदावर कोण विराजमान होणार याची चर्चा सध्या बेळगाव जिल्ह्याचे राजकीय वर्तुळात रंगली असून चिकोडी लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेले भाजपचे अण्णासाहेब जोल्ले यांचे नाव चर्चिले जात असल्याची माहिती समोर येत आहे.