बेळगाव लाईव्ह : ‘राष्ट्रवीर’कार शामराव देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ नेते, साहित्यिक आणि पत्रकार कॉ. कृष्णा मेणसे यांची निवड झाली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वा. ज्योती महाविद्यालय, क्लब रोड, बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
पत्रकारिता, शिक्षण, सहकार आणि समाज सुधारणा क्षेत्रात भरीव योगदान दिलेले ‘राष्ट्रवीर’कार शामराव देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो.
यंदा पुरस्काराचे सातवे वर्ष असून हा सन्मान ज्येष्ठ नेते, साहित्यिक आणि पत्रकार कॉ. कृष्णा मेणसे यांना
त्यांच्या सामाजिक व साहित्यिक कार्याबद्दल दिला जात आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि पुरस्कार समिती अध्यक्ष डॉ. जयसिंगराव पवार भूषविणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य, लेखक आणि पत्रकार डॉ. भालचंद्र कांगो उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ऍड. राजाभाऊ बी. पाटील, प्राचार्य आनंद कृ. मेणसे, प्राचार्य अनंतराव शा. देसाई, प्रकाश आ. मरगाळे आणि शिवाजी शा. देसाई यांनी आवाहन केले आहे.