बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहर परिसरात सुरू असलेल्या वाढत्या गांजा विक्रीवर पोलिसांनी बंदी आणून योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी मुस्लिम समाजातील पंचमंडळी आणि युवकांनी पोलीस स्थानकांवर मोर्चा काढत मागणी केली आहे.
सोमवारी रात्री प्रवाशाकडून ऑटो चालकावर व्यसनातून जीवघेणा हल्ला झाल्यानंतर बेळगावत गांजा विक्रीवर बंदी घालाव्याशी मागणी मुस्लिम समाजाकडून करण्यात येत आहे.
मंगळवार रात्री दरबार गल्ली परिसरात मुस्लिम समाजातील पंचमंडळींची बैठक झाली यावेळी शेकडोच्या संख्येने युवक कार्यकर्ते देखील उपस्थित होते यावेळी जमलेल्या शेकडो युवकांनी आणि पंचमंडळीने मार्केट पोलीस स्थानका पर्यंत पायी चालत जात पोलिसांनी गांजावर नियंत्रण आणावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
नगरसेवक मुजम्मील डोणी, शहीद पठाण यांच्यासह मुस्लिम समाजातील शेकडो युवक या ठिकाणी उपस्थित होते. मार्केट विभागाचे एसीपी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या निवेदनाचा स्वीकार करत बेळगाव शहर परिसरात गांजा विक्री होणार नाही याची काळजी घेण्याची आश्वासन देण्यात आले.
यावेळी मुस्लिम समाजाकडून खंजर गल्ली परिसर, कोतवाल गल्ली बोळ, उज्वल नगर आदी संशयास्पद ठिकाणांवर पोलीस गस्त वाढवून गांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी ही मागणी करण्यात आली.
सोमवारी ऑटो रिक्षा चालकावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीला बारा तासाच्या आत पोलिसांनी अटक करून कारवाई केली आहे त्यामुळे गांजाच्या बाबतीत देखील योग्य ती कारवाई करतील असे आश्वासन यावेळी देण्यात आले.