बेळगाव लाईव्ह: आगामी 20 डिसेंबर पासून सकाळच्या सत्रात बंद असलेली बेळगाव बेंगळूर दरम्यान इंडिगो ची विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. या संदर्भात खासदार जगदीश शेट्टर यांनी माहिती दिली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून बेळगाव बेंगळूर विमानसेवा बंद करण्याचा निर्णय एअर इंडिया घेतला होता त्यानंतर बेळगावच्या खासदारांनी यावर पाठपुरावा करत सदर विमानसेवा पूर्वरत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
इंडिगो एअरलाइन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा केल्यानंतर बेळगाव बंगळुरु दरम्यानची विमानसेवा पूर्ववत करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आगामी 20 डिसेंबर पासून बेंगळुरू ते बेळगाव सकाळी 6: 30 वाजता तर बेळगाव बेंगळुरू सकाळी : 8: 30 अशी विमानसेवा पूर्ववत होणार असल्याची माहिती खासदारांनी दिली आहे.
यासंदर्भात माजी मुख्यमंत्री आणि बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी दिल्ली मुक्कामी इंडिगो एअरलाइन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली त्यावेळी इंडिगो एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी बेळगाव बेंगळूर विमानसेवा पुन्हा बहाल करण्याचे आश्वासन दिले आहे.
डिसेंबर महिन्याच्या 20 तारखेपासून ही विमानसेवा पूर्ववत होणार असल्याने बेळगाव मधून बेंगळुरूला जाणाऱ्या प्रवाशांत समाधान व्यक्त होत आहे.
बेळगावत होणाऱ्या हिवाळी अधिवेशना समाप्ती दरम्यान ही विमानसेवा पूर्ववत होणार आहे यासाठी खासदारांनी प्रयत्न केला आहे. बेळगाव बेंगलोर विमानसेवा पूर्ववत केल्याने विमान उड्डाण राजमंत्री के आर नायडू आणि इंडिगो एअरलाइन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार जगदीश शेट्टर यांनी मानले आहेत.