बेळगाव लाईव्ह : घरफोड्या करून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला बेळगाव एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून मौल्यवान सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
वैभव नगरमध्ये विविध घरफोड्या करून लाखो रुपयांची खंडणी करणारा आरोपी मस्तान अली शेख याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे.
सोन्याचे दागिने हरवल्याची तक्रार करणाऱ्यांना मौल्यवान सोन्याचे दागिने जप्त करून त्यांच्या ताब्यात दिले जातील.
शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग, एसीपी संतोष सतनायक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी सीपीआय यूएस अवटी, पीएसआय मंजुनाथ भजंत्री, संतोष दलवाई, त्रिवेणी यांनी छापा टाकून हि कारवाई केली.