Friday, December 20, 2024

/

बेळगावच्या रस्त्यावर मराठी दक्षिणात्य संस्कृतीचे दर्शन

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहरातील रस्त्यावर गुरुवारी रात्री मराठी आणि दक्षिणात्य संस्कृतीचे दर्शन घडले निमित्त होते नवरात्री निमित्त कांगली गल्लीच्या श्री नारायणी देवीच्या आगमन सोहळ्याचे!

बेळगाव शहरातील रस्त्यावर काल गुरुवारी सायंकाळी विविध संस्कृती, परंपरा यांचे दर्शन घडले निमित्त होते बेळगावची नारायणी कांगली गल्लीच्या श्री विठ्ठल -रखुमाई मूर्तीच्या आगमन सोहळ्याचे. डॉल्बी वगैरेचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणासह अतिशय जल्लोषी वातावरणात भव्य अशा शोभायात्रेच्या स्वरूपात पार पडलेला हा सोहळा शहरवासीयांसाठी अविस्मरणीय ठरला.

सदर आगमन सोहळ्याला काल गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल प्रारंभ झाला. आगमन सोहळ्याच्या शोभायात्रेतील सुरेख आरास आणि सुशोभीकरण केलेल्या रथामध्ये श्री विठ्ठल -रखुमाईची विराजमान मूर्तीसह विविध कला, संस्कृतीची पथके साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती.

त्यामुळे शोभायात्रेच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली होती. सदर आगमन सोहळ्याची अनेक वैशिष्ट्ये होती, त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील आळंदी येथील 250 वारकऱ्यांचे पथक आणि स्थानिक वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांनी आळंदीहून पंढरपूरला जाताना श्री ज्ञानेश्वर माऊलींचे जे अश्व रिंगण पार पाडतात, त्या शितोळे सरकारच्या अश्वांचा कॉलेज रोडवर पार पाडलेला उभा रिंगण सोहळा म्हणजे शहरातील नागरिकांसाठी एक पर्वणीच होती.Narayani

ज्यामुळे अवघे वातावरण पांडुरंगमय बनले होते. शोभायात्रेतील घोडे, ढोल पथक, राम -लक्ष्मण -सीता, छ. शिवाजी महाराज, मार्तंड मल्हार, स्वातंत्र्यसैनिक आदींचे सजीव देखावे कौतुकास्पद ठरले होते. विशेष म्हणजे शोभायात्रेत दक्षिण भारतातील पारंपारिक कला आणि खेळांचे प्रदर्शन घडवण्यात आले. जे पाहण्यासाठी शहरवासीयांनी एकच गर्दी केली होती.Navratri

त्यांच्याकडून सदर ऐतिहासिक कला आणि खेळ अतिशय परिणामकारकरित्या अथक सादर करणारे दक्षिण भारतीय कला -संस्कृती पथकातील कलाकार वाहव्वा मिळवताना दिसत होते. एकंदर या शोभायात्रेमुळे प्रति अवघे पंढरपूरच बेळगावात साकारल्याची अनुभूती सर्वांना येत होती.

विविध कला, संस्कृतीची इतकी भुरळ होती की चक्क शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग आपल्या मुलीसह आगमन सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी बेळगाव लाईव्हशी बोलताना बेळगावच्या संस्कृती आणि परंपरेबाबत गौरव उद्गार काढून कांगली गल्लीच्या आगमन सोहळ्याची प्रशंसा केली. आळंदी येथून आलेल्या वारकऱ्यांच्या प्रमुखांनी बेळगावची नारायणी कांगली गल्ली आणि एकता युवक मंडळातर्फे दरवर्षी देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्राची प्रतिकृती हे मंडळ अतिशय उत्तमरीत्या साकारात असल्याबद्दल प्रशंसोद्गार काढले.Navratri

यावर्षी अभिनव उपक्रम राबवताना यांनी महाराष्ट्रासाठी आणि सनातन धर्मियांसाठी उभ्या देशाचे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी आई साहेबांची प्रतिकृती साकारली आणि ज्ञानोबा, तुकाराम रायांच्या वचनाप्रमाणे सकल वारकरी संप्रदाय घराघरापर्यंत पोहोचावा आणि सनातनी भारतीयांमध्ये एक नव चैतन्य निर्माण व्हावे म्हणून संतांचा नवरात्र या ठिकाणी सादर केला हे कार्य अतिशय आदर्शवत आहे असे सांगितले. श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी देखील कांगली गल्लीच्या वारकरी संप्रदायाचा देखावा सादर करण्याच्या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.Navratri

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.