बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्योत्सवाचा एक भाग म्हणून शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणारी मिरवणूक शहरातील जिल्हा क्रीडांगण आणि कृष्णदेवराय सर्कल येथून सुरू होणार आहे.
ही मिरवणूक डाॅ. बी.आर आंबेडकर रोड, कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल, काकतीवेस, गणपत गल्ली, कांबळी खुट, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, किर्लोस्कर रोड, ध. संभाजी महाराज चौक, यंदेखुट, कॉलेज रोड मार्गे सरदार कॉलेजच्या मैदानावर समाप्त होईल.
कर्नाटक राज्योत्सव 1 नोव्हेंबर रोजी बेळगाव शहरात मोठ्या थाटामाटात साजरा होणार असून लाखोंच्या संख्येने लोक येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक सुरळीत राहावी यासाठी दि. 1 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 5 वाजल्यापासून दि. 02 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटे 2 वाजेपर्यंत बेळगाव शहरात सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.
तसेच कर्नाटक राज्योत्सव मिरवणुकीच्या मार्गावरून जाण्यास दुचाकी वाहनांना दि. 1 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 5 वाजल्यापासून दि. 02 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटे 2 वाजेपर्यंत मनाई असेल. जनतेला पर्यायी मार्गाचा वापर करता यावा यासाठी तीनचाकी व सर्व प्रकारची हलकी वाहने यांच्या नेहमीच्या मार्गात पुढील प्रमाणे बदल करण्यात आला आहे.
1) चिक्कोडी, संकेश्वर, कोल्हापूर बाजूने कृष्णदेवराय सर्कल (कोल्हापूर कत्री), कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल मार्गे जाणारी सर्व प्रकारची वाहने जिनाबकुल सर्कलजवळ उजवीकडे वळण घेऊन बॉक्साईट रोड, हिंडलगा फॉरेस्ट नाका, हिंडलगा गणेश मंदिर, गांधी सर्कल (अर्गन तलाव), शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्र. 2, शर्कतपार्क, ग्लोब थिएटर सर्कल मार्गे खानापूर रोड वरून पुढे जातील. 2) गोवा व खानापूरकडून येणारी वाहने ग्लोबजवळ डावीकडे वळण घेऊन शर्कत पार्क, शौर्य सर्कल, महात्मा गांधी सर्कल, हिंडलगा गणेश मंदिर, हिंडलगा रोड, फॉरेस्ट नाक्याजवळ उजवे वळण घेऊन बॉक्साईट रोडने राष्ट्रीय महामार्गावर जातील.
केएसआरटीसी बसेस हिंडाल्को सर्कल अंडर ब्रिज वरून राष्ट्रीय महामार्ग क्र. 4, कॅन्सर हॉस्पिटलसमोरून एक वळण घेऊन कनकडदास सर्कलमार्गे बसस्थानकात प्रवेश करतील. 3) जिजामाता सर्कल, देशपांडे पेट्रोल पंप नरगुंदकर भावे चौकाकडे. भावे चौक/कांबळी खुटाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने पिंपळ कट्ट्याजवळ डावे वळण घेऊन पाटील गल्ली, शनिमंदिर मार्गे स्टेशन रोडने खानापूर रोडला जातील. 4) जुना पी.बी. रोडवरून खानापूरकडे जाणारी सर्व वाहने जिजामाता सर्कलवरून उजवीकडे वळण घेऊन सर्किट हाऊस, अशोक सर्कल, कनकदास सर्कल मार्गे राष्ट्रीय महामार्गाकडे जातील.
मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी चिन्हांकित केलेल्या ठिकाणांचा तपशील : केईबी पार्किंगची जागा, जुने भाजी मार्केट पार्किंग लॉट, न्याय मार्गापासून धर्मनाथ भवनापर्यंत, मराठा मंडळ कॉलेज रोड, सीपीएड मैदान.
दुचाकी पार्किंग : क्लब रोड महावीर कॅन्टीन ते महात्मा गांधी सर्कलपर्यंत, यंदेखूट ते देशपांडे खूट, शौर्य सर्कल, देशपांडे खूट ते महात्मा गांधी सर्कलपर्यंत. इस्लामिया स्कूल रोडवर मंगळसुळीखूट ते पोस्टमन सर्कल. असद खान दर्ग्या, ग्लोब सर्कल कॅम्प जवळील मोकळी जागा. बेनॉन स्मिथ कॉलेज ग्राउंड्स कॉलेज रोड, मराठा विद्यानिकेतन शाळेचे मैदान (देशपांडे खुटाजवळ), महिला पोलिस स्टेशनच्या मागे निवासी गृह मैदान.