बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहराचा उदयोन्मुख क्रिकेटपटू सुजय संजय सातेरी याची सलग दुसऱ्यांदा कर्नाटक रणजी टीमच्या वरिष्ठ संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड झाली आहे.
मागील वर्षी देखील सुजयची कर्नाटक रणजी टीम मध्ये दुसऱ्या पसंतीचा विकेटकीपर म्हणून निवड झाली होती मात्र यंदा तो कर्नाटक रणजी संघाकडून पहिल्या पसंतीचा विकेटकीपर म्हणून खेळणार आहे. नुकताच कर्नाटक रणजी टीमच्या 16 सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
16 वर्षाखालील ते 25 वर्षा पर्यंतच्या कर्नाटक रणजी संघाकडून खेळताना त्याने अनेकदा मोठ्या कामगिरी बजावल्या आहेत. यंदाच्या रणजी मोसमात तो कर्नाटकचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळणार आहे.
बेळगाव शहरातील मजगावचा रहिवासी असणारा सुजय याची दुसऱ्यांदा रणजीत टीम मध्ये निवड झाली आहे त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मागील वर्षी कर्नाटक संघाकडून खेळताना सुजयला केवळ एकच सामना खेळता आला होता मात्र यंदा तो पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक फलंदाज असल्याने कर्नाटक टीमकडून बहुतांश सामन्यांमधून तो खेळताना दिसणार आहे.
मयंक अगरवाल कर्नाटक रणजी संघाचा कर्णधार तर मनीष पांडे हा उप कर्णधार असून लुवनिथ सिसोदिया हा दुसऱ्या पसंतीचा यष्टीरक्षक असणार आहे. येरे गोड आहे कर्नाटक रणजी संघाचे कोच आहेत. कर्नाटक क्रिकेट असोसिएशन ने प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात सुजय सह संपूर्ण टीमची निवड केली आहे.