Friday, January 3, 2025

/

समाजसेवकांचे स्तुत्य कार्य; भिक्षुकाला केले ‘सिव्हिल’मध्ये दाखल

 belgaum

बेळगाव लाईव्ह:रेल्वे ओव्हरब्रिजवर सुरक्षा कठड्याला टेकून हतबल अवस्थेत बसलेल्या एका मनोरुग्ण भिक्षुकाच्या मदतीला धावून जात सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे स्तुत्य कार्य केले.

सदर मनोरुग्ण भिक्षुक आज सोमवारी खानापूर रोडवरील रेल्वे ओव्हरब्रिजवरून जाणाऱ्या प्रवाशांच्या नजरेस पडला. त्यांनी त्या भिक्षुकाची असहाय्य अवस्था पाहून सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे यांच्याशी संपर्क साधला.

मोरे यांनी त्वरीत आपली टीम जमवली आणि टिळकवाडी पोलीस स्टेशनला खबर दिली. त्यानंतर ॲलन मोरे यांच्यासह अवधूत तुडवेकर, प्रणव बेळगावकर, सॅम्युअल रॉड्रिग्स, मंतेश कुमार आणि 112 पोलिस तुकडीतील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एकत्रितपणे समन्वय राखत रुग्णवाहिकेतून त्या भिक्षुकाला काळजीपूर्वक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविले.Social work

सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे आणि त्यांचे सहकारी करत असलेल्या या स्तुत्य कार्याची ओव्हर ब्रिजवरून ये-जा करणाऱ्यांमध्ये प्रशंसा होत होती.

सध्या त्या भिक्षुकावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हा सहयोगी प्रयत्न बेळगावमधील मजबूत समुदाय भावना अधोरेखित करतो.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.