बेळगाव लाईव्ह :दसरा सण आणि नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावतर्फे काल गुरुवारपासून आयोजित श्री दुर्गामाता दौड आज कॅम्प परिसरात हिंदू -मुस्लिम बांधवांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्याद्वारे हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रदर्शन घडवत उत्साहात पार पडली.
सालाबाद प्रमाणे श्री दुर्गामाता दौडचे आगमन होणार असल्यामुळे आज शुक्रवारी सकाळी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख आणि अन्य मुस्लिम समाज प्रमुखांच्या नेतृत्वाखाली कॅम्प येथे जय्यत तयारी करण्यात आली होती.
शरकत पार्क येथील रस्त्यावर श्री दुर्गामाता दौडचे आगमन होताच साजिद शेख यांनी दौडच्या अग्रभागी असलेल्या भगव्या ध्वजाचे पुष्पहार घालून पूजन करण्याद्वारे दौडचे स्वागत केले. त्यानंतर दौंडमध्ये सहभागी सर्वांना फळे, बिस्किट, पिण्याचे पाणी आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षा डॉ राहिला साजिद शेख, अझीझ अब्बासअली, इब्राहिम शेख, अमजद पठाण, शाहिद सनदी, असद पठाण, वाहिद शेख, बाशा शेख, अर्फत शेख, महादेव मिरजकर, विणा मिरजकर, प्रकाश माळवे, जावेद शेख, साबीर शेख, सुजान, ईझान, अमीर शेख, श्री कलाली, विजय रायचूरकर आदींसह कॅम्पवासीय बहुसंख्येने उपस्थित होते.
मिलिटरी महादेव मंदिर येथील शिवतीर्थ येथून सुरू झालेली आजची श्री दुर्गामाता दौड काँग्रेस रोड, कॅम्प येथील ग्लोब टॉकीज रोड, इंडिपेंडेंट रोड, हाय स्ट्रीट, चर्च स्ट्रीट, कल्याणी स्वीट मार्ट रोड, गवळी गल्ली, कोर्ट स्ट्रीट, वेस्ट स्ट्रीट, हाय स्ट्रीट, कोंडापा स्ट्रीट,
चर्च स्ट्रीट, मद्रास स्ट्रीट, कुंती माता मंदिर, फिश मार्केट, तेलगू कॉलनी के. टी पुजारी दुर्गा माता मंदिर, खानापूर रोड, धर्मवीर संभाजी चौक मार्गे श्री दुर्गामाता मंदिर जतिमठ येथे समाप्त झाली.