बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या सीमेवर असणाऱ्या महाराष्ट्रातील चंदगड विधानसभा मतदार संघाच्या राजकारणाकडे बेळगावकरांचे विशेष लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरीही आजवर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमावासीयांनी याकडे तटस्थपणे पाहण्याची भूमिका घेतली आहे. मात्र सीमेवर असणाऱ्या चंदगड विधानसभा मतदार संघातील राजकारणाकडे सीमावासियांचे अधिक लक्ष वेधले असून ‘बेळगाव लाईव्ह’च्या वाचकांसाठी चंदगड विधानसभा मतदार संघाचे राजकीय विश्लेषण मांडण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघात सध्या बंडखोरीचे वारे अधिक वाहात आहेत. महायुतीतील अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील, त्यांच्या विरोधात निसटता पराभव झालेले भाजपचे शिवाजी पाटील गेल्या वेळी तिसऱ्या स्थानी राहिलेले जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष महाविकास आघाडीचे विनायक तथा अप्पी पाटील यांच्यात मुख्य लढत होणार आहे. दरम्यान नंदाताई कुपेकर यांना उमेदवारी देण्यासंदर्भात हालचाली सुरु असतानाच नंदाताई कुपेकर यांना उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीमध्येही बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महायुतीमधील अजितदादा पवार गटाकडून राजेश पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपचे बंडखोर उमेदवार म्हणून शिवाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यासह भाजपचेच बंडखोर उमेदवार संग्राम कुपेकर यांनीही उद्या अर्ज भरण्याचे निश्चित केले आहे.
दुसरीकडे महायुतीतमध्ये होणारी बंडखोरी थोपविण्यासाठी अंतर्गत हालचाली सुरु आहेत. महाविकास आघाडीचे घटक पक्ष नियोजित उमेदवाराच्या विरोधात गेल्यामुळे अद्याप नंदाताई कुपेकर यांच्या उमेदवारीचा निणर्य प्रलंबित ठेवण्यात आला आहे.
महाविकास आघाडीमधील गोपाळराव पाटील, अप्पी पाटील, प्रभाकर चांदेकर, अमर चव्हाण, कॉ. संपत देसाई, बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील यांनी नंदाताई कुपेकर यांच्याविरोधात बंडखोरीचा पवित्रा उचलला असून मविआ काढून अप्पी पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्याचा मिळून बनलेल्या या मतदारसंघात गेल्या निवडणुकीला राजेश पाटील हे थोडक्या मताने विजयी झाले होते. त्यांना ५५५५८ ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील यांना ५१ हजार १७३ मते मिळाली होती. तर अप्पी पाटील ४३ हजार ९७३ मते घेऊन तिसऱ्या स्थानी होते. शिवसेनेच्या संग्रामसिंह कुपेकर यांना ३३ हजार २१४ मते मिळालेली होती. राजेश पाटील विकास कामाच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. राजेश पाटील यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि मेहुणे खासदार संजय मंडलिक यांची मदत याही वेळी मिळेल हे उघड आहे. या भागात मोठ्या संख्येने असणाऱ्या काजू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आमदार पाटील यांनी पुरेशी मदत केली नसल्याने नाराजी असल्याचे सांगितले जाते. गेल्या वेळी शिवाजी पाटील यांना माजी मंत्री भरमू सुबराव पाटील यांची मोठी मदत झाली होती. लोकसभा निवडणुकीची समीकरणे पाहता यावेळी ते शिवाजी पाटील यांच्यासोबत कितपत राहणार यावर बरेचसे अवलंबून असणार आहे. विनायक पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील हे त्यांना मदत करतील. याखेरीज पाटील हे कर्नाटकातील बडे नेते सतीश जारकीहोळी बंधू यांचे निकटचे नातेवाईक असल्याने आणि हा मतदारसंघ सीमा भागाला लागून असल्याने तिकडून मोठी रसद प्राप्त होण्याची शक्यता आहे. अप्पी पाटील हे गडहिंग्लज तालुक्यातील असल्याने या भागातील मते त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात राहतील असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभेचे दिवंगत अध्यक्ष बाबा कुपेकर व माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाभुळकर या रिंगणात राहणार का यावर मविआचे भवितव्य अवलंबून असणार आहे. राजेश पाटील विकास कामाच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
राजेश पाटील यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि मेहुणे खासदार संजय मंडलिक यांची मदत याही वेळी मिळेल हे उघड आहे. या भागात मोठ्या संख्येने असणाऱ्या काजू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आमदार पाटील यांनी पुरेशी मदत केली नसल्याने नाराजी असल्याचे सांगितले जाते. गेल्या वेळी शिवाजी पाटील यांना माजी मंत्री भरमू सुबराव पाटील यांची मोठी मदत झाली होती. लोकसभा निवडणुकीची समीकरणे पाहता यावेळी ते शिवाजी पाटील यांच्यासोबत कितपत राहणार यावर बरेचसे अवलंबून असणार आहे. विनायक पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील हे त्यांना मदत करतील. खेरीज पाटील हे कर्नाटकातील बडे नेते सतीश जारकीहोळी बंधू यांचे निकटचे नातेवाईक असल्याने आणि हा मतदारसंघ सीमा भागाला लागून असल्याने तिकडून मोठी रसद प्राप्त होण्याची शक्यता आहे.
अप्पी पाटील हे गडहिंग्लज तालुक्यातील असल्याने या भागातील मते त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात राहतील असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभेचे दिवंगत अध्यक्ष बाबा कुपेकर व माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाभुळकर या रिंगणात राहणार का यावर मविआचे भवितव्य अवलंबून असणार आहे.