बेळगाव लाईव्ह: माझ्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करावेत असे आव्हान केंद्रीय कामगार आणि उद्योग राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी राज्याचे नगर विकास मंत्री सुरेश भैरत्ती यांना दिले आहे.
रविवारी सकाळी बेळगाव अशोक नगर येथे ईएसआय इस्पितळाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आव्हान दिलंय. सुरेश भैरत्ती यांनी शेकडो बुडाचे पुरावे जाळून टाकले याबाबत मी आवाज उठवला आहे यासाठी ते माझ्यावर वेगवेगळे आरोप करत आहेत. शोभा करंदलाजे कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार करणार नाही केलेला नाही भाजपाने पक्षात दिलेली जबाबदारी मी जबाबदारीने पार पडत आली आहे. पुनन्ना यांचा विद्युत खात्याशी काय संबंध आहे? खोट्या पुराव्यांच स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे का? मुख्यमंत्र्यांच्या कायदा सल्लागारांना तुम्ही ही जबाबदारी दिली का? असा प्रति सवाल देखील करंदलाजे यांनी यावेळी केला.
भैरत्ती सुरेश यांनी मुडा चे पुरावे जाळलेले खरं आहे यासाठीच पिढी आणि लोकायुक्तांची चौकशी सुरू आहे अनेक सामाजिक संस्थांनी सरकारवर लक्ष ठेवलेला आहे तुम्हाला ताकत असेल तर माझ्या भ्रष्टाचाराचे पुरावे उघडपणे जाहीर करा असे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले. कर्नाटकात होणाऱ्या पोटनिवडणुकीत एनडीए घटक पक्षाचे उमेदवार जिंकतील याशिवाय महाराष्ट्रात देखील एनडीए जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बेळगाव हे सर्वाधिक कामगार विमा कार्ड असलेले शहर आहे. बेळगाव हे विविध राज्यांशी संबंधित सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. येथे सुमारे ३ लाख आयपीधारक आहेत. बेळगावात १९८८ मध्ये बांधलेले ईएसआय रुग्णालय जीर्ण झाले असून नवीन इमारत बांधण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. येथे ५० खाटांचे रुग्णालय असून, कार्डधारकांच्या वाढत्या संख्येवर आधारित १५२ कोटी रुपये खर्चुन १०० खाटांचे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. हे रुग्णालय औद्योगिक क्षेत्रापासून दूर असून भूखंडही लहान आहे. सुसज्ज रुग्णालय बांधण्यासाठी संबंधित आमदारांनी औद्योगिक क्षेत्राजवळ जमीन देण्याची विनंती केली असून, दिल्लीत जाऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ईएसआय कार्डधारकांना आजीवन कार्ड योजना उपलब्ध करून देण्याची केंद्राची वचनबद्धता आहे. त्यांचा वैद्यकीय खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. ईएसआय रुग्णालये अद्यावत केली जातील. बेळगावातील कामगारांच्या हितासाठी केंद्र सरकार नवीन ईएसआय रुग्णालय बांधण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
ईएसआय रुग्णालयाच्या स्थलांतराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, अनुकूल वातावरण असल्यास रुग्णालय बांधले जाईल. सध्या हे रेफरल सेंटर असून रुग्णांना इतरत्र रेफर केले जात आहे. संपूर्ण देशातील रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. यावर तोडगा काढण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचे ते म्हणाले