Wednesday, October 30, 2024

/

काळ्या दिनी कडकडीत हरताळ पाळा : म. ए. समितीचे आवाहन

 belgaum

 

बेळगाव लाईव्ह : भाषावार प्रांतरचना करताना एक नोव्हेंबर 1956 रोजी त्यावेळच्या केंद्र सरकारने मुंबई राज्यातील फार मोठा मराठी प्रदेश कर्नाटकात घातला आहे. या अन्यायाविरुद्ध सीमा प्रदेशातील मराठी जनता गेली 68 वर्षे एक नोव्हेंबर रोजी काळादिन आचरणात आणून केंद्र सरकारचा निषेध करते अन्याय झालेला सीमा प्रदेश महाराष्ट्रात सामील करावा या मागणीसाठी येथे जनतेने लोकशाही प्रणित सारे मार्ग चोखाळलेले आहेत.

सत्याग्रह, मोर्चा, हरताळ, संप, उपोषण आणि इतर लोकशाही मार्गाने लढेकरून येथील जनतेने केंद्र सरकारला वेळोवेळी न्याय देण्याची विनंती केली आहे .पण केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी सीमाभागाकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे सारे. मार्ग चोखाळल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या वतीने केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार यांना प्रतिवादी बनवून सर्वोच्च न्यायालयात दावाही दाखल करण्यात आला आहे. पण याही बाबतीत अक्षम्य दिरंगाई होत आहे. पुन्हा एकदा येथील मराठी भाषिक जनतेचा निर्धार व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमा भागात वेगवेगळ्या प्रकारे काळया दिनी निषेध प्रकट करण्यात येणार आहे. बेळगाव शहर आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने एक नोव्हेंबर 2024 रोजी मुक सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल फेरीत मराठी भाषिक जनतेने प्रचंड संख्येने सामील व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.

या सायकल फेरीची सुरुवात संभाजी उद्यान महाद्वार रोड येथून सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी होणार असून बेळगाव, शहापूर आणि टिळकवाडी भागात फिरून मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे जाहीर सभा होणार आहे. या कार्यक्रमात साऱ्यांनी भाग घेऊन निषेध व्यक्त करावा असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

खानापूर समितीचे आवाहन

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष  सूर्याजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या एक नोव्हेंबर रोजी कडकडीत हरताळ पाडून केंद्र सरकारचा निषेध करावा व खानापूर स्टेशन रोड येथील श्री लक्ष्मी मंदिर येथे शुक्रवार तारीख एक नंबर रोजी केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे यामध्ये धनगर गावासह तालुक्यातील समस्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे पी एच पाटील व राजीव पाटील यांनी नागरिकांना सांगितले यावेळी भगवंत भावकर रामचंद्र पाटील यल्लाप्पा पाटील गजानन पाटील सागर पाटील मोहम्मद अली मुजावर इसाक सिंगर गाव शौकत शिंगरगाव सचिन पाटील चंद्रकांत बिडकर तुकाराम जाधव पुंडलिक पाटील ईश्वर देगावकर नामदेव बिडकर पांडुरंग पाटील असे असंख्य नागरिक उपस्थित होते

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.