बेळगाव लाईव्ह : प्रवाशांना लुटून सोने पळविणाऱ्या आरोपींना अटक करण्यात मार्केट पोलिसांना यश आले आहे. मार्केट पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार रिजवान सिराज पठाण (वय ४०, विद्यानगर, एपीएमसी, बेळगाव),
मलिकजान दस्तगीरसाब शेख (वय २६, मूळचा गोकाक सध्या राहणार एपीएमसी) आणि विनायक अरुण हिंडलगेकर ( वय 32, सध्या राहणार जुने गांधीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ७ लाख रुपये किमतीचे १०० ग्रॅम सोन्याचे दागिने यासह मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त एस. डी. सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट उपविभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक महांतेश धामन्नवर, पोलीस उपनिरीक्षक एच.एल.केरुर, पोलीस कर्मचारी लक्ष्मण कडोलकर, शिवप्पा तेली,
आय.एस.पाटील, शंकर कुगटोळ्ळी , सुरेश कांबळे, कार्तिक एमजी, श्रीमती अनिता हंचनाळ आदींसह मार्केट पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.