Wednesday, January 22, 2025

/

कोट्यवधींच्या ऑनलाईन ट्रेडिंग व्यवहारातून दुसऱ्यांदा बालकांचे अपहरण!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : ऑनलाईन ट्रेडिंग साठी गुंतविण्यात आलेल्या ७ कोटी रुपयांच्या रकमेच्या व्यवहारातून अथणी तालुक्यातील दोन चिमुरड्यांचे अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला आहे. काल दोन बालकांच्या अपहरणानंतर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणाचा तपास घेत अखेर अपहृत बालकांची सुटका करण्यात अथणी पोलिसांना यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अथणी तालुक्यातील कोहळ्ळी येथील हुलगबाळ रोडवरील आपल्या घरी खेळत असलेल्या 4 आणि 3 वर्षांच्या दोन लहान मुलांचे कार गाडीतून अपहरण करून फरारी होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघाजणांवर पोलिसांनी गोळीबार करून अपहृत मुलांची सुखरूप सुटका केली. स्वस्ती देसाई आणि वियोम देसाई अशी अपहृत बालकांची नवे असून त्यांना अथणी पोलिसांनी सुरक्षितपणे पालकांकडे सुपूर्द केले आहे.

नंबर प्लेट नसलेल्या कार गाडी मधून मुलांचे अपहरण केल्याची घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. याप्रकरणी अपहृत मुलांचे वडील विजय देसाई यांनी सांगितले की, आपण आणि आपली पत्नी दोघेही कामासाठी घराबाहेर होतो. त्यावेळी मुलांची आजी घरात एकटीच असताना अपहरणाची घटना घडली.Sp bgm

मुलांच्या पालकांनी अथणी पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर भादवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. काल अपहरणाची घटना घडल्यानंतर आज शुक्रवारी पहाटे पळवलेल्या मुलांना घेऊन अपहरणकर्ते कारगाडीतून कोहळ्ळी सिंदूर मार्गे महाराष्ट्राच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी संशयावरून कार गाडी अडवली. तेंव्हा अपहरणाच्या घटनेचा उलगडा झाला.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार अडविल्यानंतर आरोपींनी पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांना नाईलाजाने स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला. पोलिसांच्या फायरिंगमध्ये अपहरणकर्त्यापैकी एक संशयित जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अथणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांनी त्या दोन अजान मुलांना सुखरूपपणे त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. अपहरणाची हि दुसरी वेळ असून अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.