बेळगाव लाईव्ह :खानापुरातील लॉजवर छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या पाच तरुणींची सुटका करण्यात आली असून या प्रकरणी 11 जणांना ताब्यात घेतले आहे.
खानापूरचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खानापूर शहराच्या मुख्य रस्त्यावरील एका लॉजवर छापा टाकून वेश्याव्यवसायात गुंतलेल्या पाच तरुणींची सुटका केली या प्रकरणी अकरा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत खानापूर पोलिसांनी शहरातील एका लॉजवर छापा टाकून वेश्याव्यवसाय करणा-या रॅकेटचा छडा लावला. तरुणींना महिला सुधार केंद्रात पाठवण्यात आले.
या कारवाईत पीएसआय चन्नकेशव बबली, हेडकॉन्स्टेबल जयराम हम्मन्नवर, बाळाप्पा यलीगारव पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.