Friday, January 10, 2025

/

ज्योती कुकडोळकर -भरमुचे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील लोकमान्य ग्रंथालयामध्ये युवा लेखिका ज्योती कुकडोळकर-भरमुचे यांच्या ‘क्लटर टू क्लॅरिटी’ या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन समारंभ काल रविवारी सायंकाळी थाटात पार पडला.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष जगदीश कु़ंटे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बुक लव्हर्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य उदय लवाटे यांच्यासह व्यासपिठावर लेखिकेसह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनंत लाड उपस्थित होते. प्रारंभी सुश्री गिरीजा हलगेकर व श्रीया भातकांडेनी सुंदर ईशस्तवन आणि प्रार्थना सादर केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसूच उदय लवाटे, जगदीश कुंटे, ज्योती कुकडोळकर-भरमुचे, मनोहर कुकडोळकर व ईश्वर लगाडे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना मुळच्या बेळगावच्या पण सध्या बेंगळुरूमध्ये असलेल्या लेखिका सौ. ज्योती यांनी अंजना रीतोरिया यांच्या व्हिडिओतून लेखनाची प्रेरणा कशी घेतली व या पुस्तकाचे लेखन आपण कसे केले याची सुंदर माहिती दिली.

दैनंदिन जीवनात आपण घरात नको असलेल्या वस्तुंचा पसारा कसा करतो व मग तो कसा आवरायचा या विषयी या पुस्तकात आपण मार्गदर्शन केले आहे. लहान वयातच ही सवय लावली मुलांच्या जीवनात पुढे चांगल्या सवयी लागून भरपूर वेळ वाचतो असे त्या म्हणाल्या. प्रमुख पाहुणे उदय लवाटे यांनी पुस्तकाचे व लेखिकेचे कौतुक करीत समायोचीत विचार व्यक्त केले.Jyoti kukdolkar

अध्यक्षीय समारोपात जगदीश कुंटेनी जीवनात निटनेटकेपणा आवश्यक असल्याचे अधोरेखित करीत लेखिकेला शुभेच्छा दिल्या. अनंत लाड यांनी सुत्रसंचलन केले, तर रमेश कुकडोळकर यांनी आभार मानले.

चहापानापूर्वी लेखिकेने श्रोत्यांसाठी छोटासा क्वीझचा खेळ घेत बरोबर उत्तर देणाऱ्यांना बक्षीसे देत कौतुक केले. कार्यक्रमासाठी पुस्तक प्रेमी व कुकडोळकर-भरमुचे परिवाराची मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.