बेळगाव लाईव्ह:बेंगलोर आणि बेळगाव दरम्यान सकाळी विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता इतर शहरांमधून बस किंवा विमान यासारख्या पर्यायी वाहतूक पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. कारण इंडिगो एअरलाइन्सने येत्या 27 ऑक्टोबर 2024 पासून या मार्गावरील सकाळची थेट उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंडिगोच्या बेंगलोर -बेळगाव दरम्यानच्या सकाळच्या विमानसेवेने गेल्या वर्षभरात 85 टक्के इतकी प्रभावी प्रवासी वाहतूक करून सातत्याने मजबूत कामगिरी दाखवली होती.
सदर सेवा सुरू झाल्यानंतर बरोबर दोन वर्षांनंतर आता ही सेवा अचानक रद्द केल्याने वारंवार प्रवासी त्रस्त झाले आहेत. उपलब्ध माहितीनुसार इंडिगोने हिवाळ्यातील वेळापत्रकाचा भाग म्हणून या मार्गाचे बुकिंगही थांबवले आहे.
स्टार एअरने यापूर्वीच जोधपूर, सुरत, इंदूर आणि नाशिकसारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी उड्डाणे रद्द केल्यामुळे बेळगाव विमानतळावरील प्रवासी वाहतुकीत घट झाली आहे. हिवाळ्याच्या वेळापत्रकात बेळगावच्या अहमदाबाद मार्गावरही कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.
बेळगाव प्रदेशातील प्रवासी दीर्घकाळापासून इंडिगो एअरबसला चेन्नई, वाराणसी, पुणे, कोलकाता या शहरांमध्ये मुंबई आणि हैदराबादला जाणाऱ्या अतिरिक्त फ्लाइटसह नवीन फ्लाइट कनेक्शनसाठी सल्ला देत आहेत.
तथापी दुर्दैवाने गेल्या दोन वर्षांत कोणतेही नवीन मार्ग सुरू करण्यात आलेले नाहीत. ज्यामुळे फुरसतीने प्रवास करणारे आणि व्यावसायिक प्रवासी या दोहोंसाठी कनेक्टिव्हिटीमधील अंतर वाढले आहे. यात भर म्हणून परिस्थिती अधिक बिकट करताना सध्याची उड्डाणे देखील रद्द केली जात आहेत.
इंडिगोची बेंगलोर आणि बेळगाव दरम्यानची सकाळची थेट उड्डाणे बंद होणार असल्यामुळे प्रवाशांमध्ये निराशा वाढली आहे. एकंदर परिस्थिती पाहता नवीन मार्ग सुरक्षित करणे दूरची गोष्ट निवडून आलेल्या प्रतिनिधींना आता आहेत
त्या विमान सेवा सुरू ठेवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. दरम्यान, बेळगाव विमानतळावरील टर्मिनल 2 चे बांधकाम सुरू असून त्याच्या विस्तारासाठी अतिरिक्त 56 एकर जमीन संपादित केली जाणार आहे.