Thursday, October 31, 2024

/

तानाजी गल्ली प्रस्तावित उड्डाणपूल रद्द!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावचा झपाट्याने वाढता विस्तार पाहता बेळगावच्या रहदारीमध्येही वाढ झाली आहे. वाहतुकीच्या समस्या दिवसागणिक वाढत असल्याचे लक्षात घेत प्रशासनाने अनेक ठिकाणी फ्लायओव्हर निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

याच पार्श्वभूमीवर बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या ताशिलदार गल्ली, महाद्वार रोड, भांदूर गल्ली, तानाजी गल्ली, महाद्वार रोड भागाला जोडणाऱ्या रस्त्यावर देखील रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

तानाजी गल्ली येथे असणाऱ्या रेल्वेगेटनजीक रेल्वेउड्डाणपूल बांधण्यासाठी प्रस्ताव मांडून याबाबत तयारीही सुरु होती. मात्र स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांचा विरोध लक्षात घेत प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करण्यात येणार आहे.

बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन खासदार जगदीश शेट्टर आणि विविध खात्याचे अधिकारी यांच्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बैठक झाली त्या बैठकीत या फ्लाय ओवर बाबत चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये स्थानिक नागरिक बाळान्ना कगगनगी ,राहुल मुचंडी नगरसेवक भागवत, राजू भातकांडे, इंद्रजीत पाटील आदी उपस्थित होते.Tanaji galli

प्रस्तावित उड्डाणपुलामुळे येथील नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्याने याविरोधात नागरिकांनी आवाज उठविला होता. येथील नागरिकांची बाजू ‘बेळगाव लाईव्ह’ नेही उचलून धरत नागरिकांचे म्हणणे मांडले होते. अखेर प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करण्यात आल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त करत ‘बेळगाव लाईव्ह’चे आभार मानले आहेत.

यासंदर्भात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सर्व लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक तसेच व्यापाऱ्यांशी चर्चा करून बैठक बोलावून यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. बेळगाव महापालिकेतील ठराव आणि खासदारांचे शिफारस पत्र वरिष्ठांना पाठवून देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर या ठिकाणच्या प्रस्तावित फ्लाय ओव्हर होणार नाही याची अंमलबजावणी केली जाणार आहे.Deewali 2024

या उड्डाणपुलाच्या असलेल्या विरोधाबाबत उपरोक्त सर्वांनी अर्ज सादर केल्यास पुढील कार्यवाहीसाठी पत्र पाठवून शिफारस केली जाईल, याठिकाणी पादचाऱ्यांसाठी पूल उभारण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र पादचाऱ्यांसाठी पूल किंवा रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.Deewali 2024

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना येथील रहिवासी अभिजित चव्हाण म्हणाले, नियोजित उड्डाणपूल रद्द करण्यात आल्याने याचा आनंद होत आहे. यासंदर्भात पुढील कारवाईसाठी महानगरपालिकेच्या बैठकीत ठराव मांडण्यात येणार असून पुढील प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. रेल्वे उड्डाणपुलाचा मुद्दा ‘बेळगाव लाईव्ह’ ने उचलून धरत येथील नागरिकांच्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या यामुळे ‘बेळगाव लाइव्ह’चेही त्यांनी आभार मानले.Deewali 2024

येथील स्थानिक नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी देखील प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून आभारही मानले आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर येथील नागरिकांना प्रशासनाने दिवाळी भेट दिल्याची प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली.Maratha bank

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.