बेळगाव लाईव्ह: बेळगावच्या हवाई प्रवाशांसाठी खुशखबर! नोव्हेंबरच्या मध्यापासून फ्लाय91 एअरलाइन्स बेळगावला गोवा (मोपा), हुबळी आणि हैदराबादशी जोडणारी विमान सेवा सुरू करणार आहे. हा नवीन मार्ग विस्तार डीजीसीए वेबसाइटवरील हिवाळी वेळापत्रकात अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आला आहे.
नवीन संपर्कांसाठी (कनेक्शन) सर्व दैनंदिन उड्डानांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. आयसी 1843 : हैदराबाद (एचआयडी) ते बेळगाव (आयएक्सजी) प्रस्थान -10:55 आगमन (आयएक्सजी) -11:45 दररोज. हैदराबादला (एचआयडी) निर्गमन (आयएक्सजी) सकाळी 08:35, आगमन (एचआयडी) सकाळी 10:25 दररोज.
आयसी 1842 : हुबळी ते बेळगाव : हुबळी सकाळी 7:30 निर्गमन आगमन बेळगाव सकाळी 8:00 दररोज.
आयसी 1843 : बेळगाव ते हुबळी
प्रस्थान बेळगाव दुपारी 12:15, आगमन हुबळी दुपारी 12:45 दररोज.
आयसी 1845 : हुबळीहून बेळगाव आगमन रात्री 8:10.
आयसी 1845 : बेळगाव ते गोवा
बेळगाव प्रस्थान रात्री 8:40, गोवा आगमन रात्री 9:15.
आयसी 1844 : बेळगाव आगमन दुपारी 2:25.
स्टार एअरची मुंबई, जयपूर, अहमदाबाद, तिरुपती, नागपूर पर्यंतची उड्डाण, त्याचप्रमाणे इंडिगोची हैदराबाद, बेंगलोर (दुसरी सकाळची विमान सेवा दि. 6 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल) आणि दिल्ली पर्यंतची उड्डाणे देखील सुरू राहतील.
दरम्यान, राज्याची राज्यधानी बेंगलोरला तात्काळ जाण्यासाठी उपयुक्त बेळगाव -बेंगलोर इंडिगो 6ई- 7285- 7286 विमान सेवा कोणत्याही कारणास्तव बंद करू नये. याकडे विमानोड्डाण राज्य मंत्री नायडू यांनी लक्ष द्यावं, अशी जोरदार मागणी प्रवासीवर्गाकडून करण्यात येत आहे.