Friday, October 18, 2024

/

कंटेनर व दुचाकीच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कंटेनर व दुचाकीची अमोरासमोर धडक बसल्याने झालेल्या अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील जांबोटीजवळील आमटे गावाजवळ घडली.

निखिल बाबागौडा पाटील (१९) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावातील रहिवासी असून, बेळगाव येथील जीआयटी महाविद्यालयात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले.

दुसरा विद्यार्थी, मुडलगी येथील निखिल रमेश बेलागौडा हा गंभीर जखमी झाला आहे. आज वाल्मिकी जयंतीनिमित्त महाविद्यालयाला सुटी असल्याने हे दोघे विद्यार्थी दुचाकीवरून गोव्याला जातेवेळी जांबोटीजवळ समोरून येणाऱ्या कंटेनर वाहनाची धडक बसल्याने हा अपघात घडला.

खानापूरचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक, पीएसआय गिरीश एम यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. यानंतर झालेल्या अपघाताचा पंचनामा करून अपघाताचा गुन्हा खानापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला.

जखमीला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तर मृत तरुणाचा मृतदेह जिल्हा इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.