बेळगाव लाईव्ह : १ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येणारी राज्योत्सव मिरवणूक दरवर्षीनुसार यंदाही भव्य प्रमाणात साजरी केली जाईल, यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोक्त माहिती दिली.
राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजिण्यात येणाऱ्या मिरवणुकीत विविध सांस्कृतिक कार्य्रक्रम आयोजिण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावरील विविध प्रयोजनासंदर्भात प्रशासकीय पातळीवर तसेच विविध संघटनांशी चर्चा करून तयारी करण्यात येत आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांसह संपूर्ण कर्नाटकात केंद्रबिंदू ठरणारी आणि विविध जिल्ह्यातील नागरिकांच्या सहभागाने भव्य प्रमाणात काढली जाणारी मिरवणूक पाहण्यासाठी कित्तूर चन्नम्मा चौकात प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे.
या गॅलरीमध्ये महिलांसाठी विशेष सोय करण्यात येणार असून राज्योत्सव मिरवणुकीदरम्यान बेळगावचे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
राज्योत्सव आणि मिरवणुकीसंदर्भात पूर्वतयारी करण्यात आली असून राज्योत्सव साजरा करण्यासाठी कोणत्याही अनुदानाची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.