Saturday, October 5, 2024

/

दोन अस्वलांच्या हल्ल्यात मुंडवाड येथील शेतकरी गंभीर जखमी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील मुंडवाड गवळीवाडा येथील शेतकरी विनोद जाधव वय (वय 46), हे पहाटे आपल्या शेताकडे जात असताना, दोन अस्वलानी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविल्याने ते गंभीर झाले असून, रुग्णवाहिकेतून उपचारीसाठी त्यांना बेळगाव येथील सिविल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, आज पहाटे सदर शेतकरी आपल्या शेताकडे जात असताना दोन अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्ला होताच त्यांनी प्रतिकार करून सदर अस्वलापासून आपली सुटका करून घेतली.

याची माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचे सहाय्यक रवी पाटील यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच रवी पाटील यांनी रुग्णवाहिकेला फोन करून रुग्णवाहिका त्या ठिकाणी पाठविली.Bear attack

त्यानंतर ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेतून सदर शेतकऱ्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी याबाबत वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून संबंधित शेतकऱ्यावर योग्य ते उपचार होण्यासाठी व नुकसान भरपाई मिळण्याबाबत कारवाई करण्यास सांगितले आहे.Navratri

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.