Thursday, October 31, 2024

/

बसुर्ते गावात सर्व्हेच्या नावावर शेतजमिनीचे मोजमाप!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये चोहोबाजूंनी शेतकऱ्यांना वेठीला धरून कोंडीत अडकवण्याचा प्रयत्न सुरु असून रिंगरोड, बायपास, रेल्वे मार्ग यासह अनेक प्रकल्पांसाठी शेतजमिनी हडप केल्या जात आहेत. शेतजमिनी संपादित करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा कुटील डाव आखण्यात येत असून बेळगाव ग्रामीण भागातील बसुर्ते या गावात देखील आता शेतजमिनीवर सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे.

बसुर्ते या गावामध्ये जवळपास 250 एकर जमिनीवर सर्व्हे सुरु आहे. एकीकडे अवकाळीचा तडाखा, पिकावर पडलेली रोगराई अशा समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्याला प्रशासकीय पातळीवर देखील समस्या निर्माण करून दिल्या जात आहेत. सर्व्हेच्या नावावर सुरु असलेले कामकाज, विविध ठिकाणी लावण्यात आलेले पांढऱ्या रंगातील झेंडे यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सुरु असलेल्या या प्रकारावरून गावात विविध चर्चांना ऊत आला असून सर्व्हे नेमका कशासाठी केला जात आहे? याबाबत विविध उलटसुलट चर्चा सुरु आहेत. अशातच गावातील राष्ट्रीय पक्षांचे काही नेते शेतकऱ्यांच्या समूहामध्ये लाखो रुपयांचे आमिष देत याप्रकरणी मौन बाळगण्याचा सांगत असल्याचे समोर आले आहे.Land

यासंबंधी शेतकऱ्यांना व ग्राम पंचायतीला कोणतीही नोटीस अथवा सूचना आलेली नाही. या सगळ्या गोंधळाच्या परिस्थिती मुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यादरम्यान भाजप नेते धनंजय जाधव यांनी या भागात भेट देत सर्व्हेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. जोवर या प्रकल्पा संदर्भात अधिकारी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांसोबत चर्चा करून विश्वासात घेत नाहीत, तोवर हे कामकाज करू दिले जाणार नाही,Deewali 2024

एक आठवड्याच्या आत शेतकऱ्यांसोबत चर्चा न केल्यास तसेच शेतकऱ्यांच्या विरुद्ध जबरदस्तीने जमिनी कब्जा करायचा प्रयत्न करण्यात आल्यास, उचगाव क्रॉस वेंगुर्ला रोड येथे रास्ता रोको करून मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी उपस्थित महिला शेतकऱ्यांनीही आक्रमक पवित्रा घेत कोणत्याही परिस्थितीत शेतजमिनीवर कब्जा करू देणार नाही, कोणताही प्रकल्प सुरु करू देणार नाही, असा पवित्रा घेतला. याच शेतजमिनीवर येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह सुरु असून शेतकऱ्यांना नाहक त्रास देणे थांबवावे अशी प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली.Deewali 2024

यावेळी नेताजी बेनके, पवन देसाई, यतेश हेब्बळकर, मिथील जाधव व गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.