Thursday, November 21, 2024

/

अशी असेल आर्ट्स सर्कलची दिवाळीची संगीत मैफल

 belgaum

बेळगाव लाईव्ह :आर्ट्स सर्कल, बेळगांव तर्फे दिवाळी पहाटेचा संगीत कार्यक्रम मंगळवार दि. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित केलेला आहे. पहाटे ठीक ६ वाजता विदुषी अपूर्वा गोखले ह्यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम रामनाथ मंगल कार्यालय, (पहिला क्रॉस, भाग्यनगर) येथे सादर होईल. त्यांची तबला साथ श्री. अंगद देसाई आणि संवादिनी साथ ॲड्. रवींद्र माने हे करतील. कार्यक्रमास सर्वांना मुक्त प्रवेश असून रसिकांनी वेळेत उपस्थित राहावे असे अध्यक्षा लता कित्तूर कळवितात.

अपूर्वा गोखले

पाच पिढ्यांचा संगीताचा वारसा लाभलेल्या अपूर्वा गोखले यांचे प्राथमिक शिक्षण त्यांचे आजोबा ज्येष्ठ बुजुर्ग गायक आणि व्हायोलिनवादक पंडित गजाननबुवा जोशी यांच्याकडे झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे काका श्री मधुकर जोशी यांच्याकडे तालीम झाली. आत्या कै. डॉ. सुचेता बिडकर, वडील श्री मनोहर जोशी, पंडित अरुण कशाळकर, पंडित शंकर अभ्यंकर, कै. श्रीमती माणिक भिडे, पंडित उल्हास कशाळकर, यांचेही मार्गदर्शन लाभले.

सध्या अपूर्वा गोखले यांना श्री. यशवंत महाले यांच्याकडून तालीम मिळत आहे.

अपूर्वा यांचे देश विदेशात अनेक एकल व बहीण पल्लवी जोशी यांच्यासोबत सहगायनाचे अनेक कार्यक्रम झाले आहेत.

अनेक पुरस्कार, स्कॉलरशिपच्या त्या मानकरी असून त्यांना भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या ज्युनियर फेलोशिपच्याही मानकरी आहेत. एस.एन.डी टी विद्यापीठ, मुंबई इथे काही काळ व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून काम केले असून सध्या पुण्याच्या भारती विद्यापीठात संगीत विभागात गुरू म्हणून त्या कार्यरत आहेत.Deewali maifal

तबला साथ: श्री. अंगद देसाई
अंगद देसाई हे तंत्रज्ञानाचे स्नातक पदवीधर आहेत. लहानपणापासून त्यांना तबल्याची आवड आहे आणि त्यांनी तबल्याचे शिक्षण पं. बंडोपंत कुलकर्णी आणि पं. संतोष कुलकर्णी यांच्याकडे घेतले. सध्या पं. कल्याणराव देशपांडे यांच्याकडे त्यांचे तबल्याचे शिक्षण सुरू आहे. अनेक गायक वादकांची तबला साथ त्यांनी समर्थपणे केलेली आहे. देशविदेशात अनेक ठिकाणी त्यांच्या तबला एकल वादनाचे कार्यक्रम झालेले आहेत.

संवादिनी साथ: पं.रवींद्र माने
बेळगांवकरांना सुपरिचित असलेल्या रवींद्र माने ह्यांचे संवादिनी वादनाचे शिक्षण ख्यातनाम संवादिनी वादक पं. रामभाऊ विजापुरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कर्नाटक आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या संवादिनी वादनाचे कार्यक्रम झालेले आहेत. अनेक उत्तमोत्तम गायकांना त्यांनी समर्थ संवादिनी साथ केलेली आहे. वाणिज्य शाखेची आणि विधी शाखेची स्नातक पदवी त्यांना मिळालेली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.