बेळगाव लाईव्ह :कर्नाटक क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंडच्यावतीने आयोजित अंधांच्या कर्नाटक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बेळगाव जिल्ह्याच्या समृद्ध फाउंडेशन क्रिकेट संघाला आपटेकर स्पोर्ट्स फाऊंडेशनच्यावतीने क्रिकेट किट देणगी दाखल देण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
कर्नाटक क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंडच्यावतीने म्हैसूर येथे येत्या दि. 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी अंधांसाठी कर्नाटक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी समृद्ध फाउंडेशन फॉर डिसेबल्ड बेळगाव आपला अंधांचा क्रिकेट संघ पाठवत आहे.
या संघाला क्रिकेट किट ची गरज आहे हे लक्षात घेऊन आपटेकर स्पोर्ट्स फाऊंडेशनने सदर संघाला पॅड, ग्लाऊज, आर्मगार्ड वगैरे क्रिकेटचे किट देणगी दाखल दिले आहे. शहरातील जयनगर येथील समृद्ध फाउंडेशन फॉर डिसॅबल्डच्या कार्यालयामध्ये झालेल्या क्रिकेट किट देण्याच्या या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष शिवनगौडा पाटील, सचिव प्रशांत पोतदार, आपटेकर स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष मिस्टर इंडिया सुनील आपटेकर, प्रतीक आपटेकर, अमर आपटेकर, केदार आपटेकर, राजू लांबोरे, जुनेद बाबुनईकर आणि क्रिकेट संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना मिस्टर इंडिया सुनील आपटेकर यांनी भारतीय पॅरा ॲथलीट पॅरा ऑलिम्पिकमध्ये आपली उल्लेखनीय कामगिरी दाखवत आहेत आणि बेळगावच्या अशा प्रतिभेला मदत करताना आपटेकर स्पोर्ट्स फाऊंडेशनला आनंद होत आहे.
लोकांनी पुढे येऊन या खेळाडूंना त्यांच्या भविष्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे, असे विचार व्यक्त केले. शेवटी आपटेकर स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या देणगीबद्दल समृध्द फाउंडेशन फॉर डिसेबलचे सचिव प्रशांत पोतदार यांनी आभार मानले.