Wednesday, October 16, 2024

/

एपीएमसी पोलिसांच्या कारवाईत दुचाकीचोर अटकेत

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विविध ठिकाणच्या दुचाकी चोरी प्रकरणाचा तपास घेत एपीएमसी पोलिसांनी दुचाकी चोराला अटक करून ८ दुचाकी जप्त केल्या आहेत.

बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त, गुन्हे आणि वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त, शहर पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस, मार्केट उपविभागाचे पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलिसांनी हि कारवाई केली आहे.

याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी हेमंत शिवाजी जांगळे (रा. ज्योतीनगर, सध्या राहणार गॅंगवाडी, रामनगर, बेळगाव) याला अटक केली असून त्याच्याकडून ८ दुचाकी जप्त केल्या आहेत. के. एल. इ. रुग्णालय परिसरात संशयास्पदरित्या फिरत असल्याचे आढळून येताच त्याची चौकशी करण्यात आली.Apmc

यावेळी त्याने ८ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. एपीएमसी पोलीस ठाणे आणि संकेश्वर पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील प्रत्येकी एक मोटारसायकल चोरण्यात आली होती. त्याच्या मूळ मालकांचा शोध लागला आहे. मात्र उर्वरित ६ मोटारसायकलींच्या वाहनमालकांचा शोध सुरू आहे. सदर आरोपीवर भादंवि कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

पोलीस निरीक्षक श्री.आर.आर.पाटील (प्रभारी), पीएसआय मंजुनाथ भजंत्री, त्रिवेणी नाटीकर, बी.के.मिटगार , एएसआय बी.एम.नरगुंद , एफ.बी. मुजावर, खादर खानम्मवर, गोविंद पुजारी आणि एन.डी. बिरगोंडा आदींचा या कारवाईत सहभाग होता. या सर्वांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.