Friday, October 18, 2024

/

नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट नदीपात्रात : दाम्पत्याला जलसमाधी!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : दुचाकीवरील वेगनियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट नदीपात्रात गेल्याने दाम्पत्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना हुक्केरी तालुक्यात घडली आहे.

हुक्केरी तालुक्यातील नोगणीहाळ गावातील घटप्रभा नदीच्या तीरावरील पुलावर हा अपघात झाला असून पूल पार करताना वेगाचे भान न राहिल्याने तोल जाऊन दुचाकीसहित दाम्पत्य नदीमध्ये बुडाले.Hukkeri

सुरेश बडिगेर (वय ५३) आणि जयश्री बडिगेर (वय ४५) अशी दुर्दैवी मृत दाम्पत्याची नावे आहेत. जयश्री बडिगेर या महिलेचा मृतदेह अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढला असून अद्याप सुरेश बडिगेर यांचा मृतदेहाचे शोधकार्य सुरु आहे.

पुलाला संरक्षक कठडा नसल्याने हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. घटनास्थळी हुक्केरी पोलिसांनी येऊन पंचनामा केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.